गुरुवारपासून (दि. 27 जुलै) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी उभय संघात कसोटी मालिका खेळली गेली, जी भारताने 1-0ने आपल्या नावावर केली. अशात आता कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिज मालिका महत्त्वाची असल्याचे बोलला आहे. रोहित म्हणाला आहे की, या मालिकेत अनेक नवीन खेळाडू आहेत आणि या मालिकेत त्यांना संधी दिली जाईल.
युवा खेळाडूंना मिळणार संधी
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आमच्यासाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेत अनेक नवीन खेळाडू भाग घेत आहेत. त्यांनी जास्त सामने खेळले नाहीयेत. या मालिकेत त्यांना संंधी दिली जाईल. या मालिकेत त्यांना भूमिका दिली जाईल की, यानुसारच तुम्ही फलंदाजी करा. जी भूमिका त्यांना दिली आहे, ती ते कशाप्रकारे पार पाडतात, हे पाहण्याची आम्हालाही एक संधी मिळेल.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “मागील वर्षी टी20 विश्वचषकापूर्वीही आम्ही यावर लक्ष दिले होते की, संघात जे नवीन खेळाडू आले होते, त्यांना भूमिका दिली जाईल. वेस्ट इंडिज मालिकेत 3 सामने खेळले जाणार आहे. आम्ही पाहू की, या मालिकेत कुणाला संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर जो निर्णय घ्यायचाय तो निर्णय घेऊ.”
#TeamIndia Captain @ImRo45 on the importance of West Indies series 🔽#WIvIND pic.twitter.com/hSDjubcSNr
— BCCI (@BCCI) July 26, 2023
रोहितकडे विक्रम रचण्याची संधी
रोहित शर्मा याच्याकडे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत विक्रम रचण्याची संधी आहे. रोहित या मालिकेत वनडे कारकीर्दीत 10000 धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम रचू शकतो. त्याला 10000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 175 धावांची गरज आहे. रोहितने आतापर्यंत 243 सामने खेळताना 236 डावांमध्ये 48.63च्या सरासरीने 9825 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 30 शतके आणि 48 अर्धशतके झळकावली आहेत. आता रोहित हा विक्रम रचतो की, नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (cricketer rohit sharma reveals why west indies odi series is important for team india)
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीनंतर वनडेतही 100 टक्के तळपणार विराटची बॅट, असं आम्ही नाही ‘ही’ लाजवाब आकडेवारी सांगतेय
ब्रेकिंग! वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारताचा हुकमी एक्का बाहेर, धक्कादायक कारण आले समोर