• About Us
  • Privacy Policy
गुरूवार, सप्टेंबर 28, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

विरोधी संघांनो सावधान! वनडे विश्वचषकात खेळण्यासाठी इंग्लंडचा जबरदस्त खेळाडू फिट, लगेच वाचा

विरोधी संघांनो सावधान! वनडे विश्वचषकात खेळण्यासाठी इंग्लंडचा जबरदस्त खेळाडू फिट, लगेच वाचा

Atul Waghmare by Atul Waghmare
जुलै 27, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
England-Team

Photo Courtesy: Twitter/ICC


वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतात पार पडणार आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रकही समोर आले आहे. यावेळी क्रिकेटच्या महासंग्रामात 10 संघ सहभाग घेत आहेत. वनडे विश्वचषक 2019 स्पर्धेचे ट्रॉफी इंग्लंड संघाने जिंकली होती. त्यावेळी त्यांनी अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभवाचा धक्का दिला होता. अशात विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर विश्वचषक खेळण्यासाठी तयार झाला आहे.

आर्चर विश्वचषकासाठी तयार
इंग्लंड संघाला 2019च्या वनडे विश्वचषकाची ट्रॉफी जिंकून देण्यात जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने वनडे विश्वचषक 2019च्या 11 सामन्यात 20 विकेट्स चटकावल्या होत्या. मात्र, कोपराच्या दुखापतीमुळे तो तब्बल 2 वर्षे क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यानंतर त्याने पुनरागमन करत 2023मध्ये इंग्लंडसाठी 4 वनडे आणि 3 टी20 सामने खेळले. त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएल 2023 हंगामात 5 सामने खेळत 2 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये कोपराची दुखापत त्रास देऊ लागल्यानंतर त्याला इंग्लंड संघाने माघारी बोलावले होते.

प्रशिक्षकाचे विधान
ससेक्स संघाचे प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “जोफ्रा आर्चर ठीक आहे. मला वाटते की, विश्वचषक खेळण्यासाठी तो पूर्णपणे तयार आहे. जर इंग्लंड संघ पुढील ऍशेस मालिकेत त्याला घेऊन जायचे असेल, तर त्यांना हे पाहावे लागेल की, आर्चरकडून सर्वोत्तम प्रदर्शन कशाप्रकारे करून घेतले जाऊ शकते.”

Could we see Jofra Archer at #CWC23? 👀

Latest on the England pacer's fitness 👇https://t.co/8exckmCGrT

— ICC (@ICC) July 27, 2023

तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळलाय आर्चर
जोफ्रा आर्चर याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो सन 2021नंतर कोणताही कसोटी सामना खेळला नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत मार्क वूड आणि ख्रिस वोक्स यांसारख्या खेळाडूंनी इंग्लंडसाठी शानदार कामगिरी केली आहे. आर्चर इंग्लंड संघाकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळला आहे. त्याने 13 कसोटीत 42 विकेट्स, 21 वनडेत 42 विकेट्स आणि 15 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. (england star pacer jofra archer fit in time for odi world cup 2023 cricket team read)

महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिज मालिका एवढी महत्त्वाची आहे तरी का? कॅप्टन रोहितने सांगितलं मोठं कारण
कसोटीनंतर वनडेतही 100 टक्के तळपणार विराटची बॅट, असं आम्ही नाही ‘ही’ लाजवाब आकडेवारी सांगतेय


Previous Post

वेस्ट इंडिज मालिका एवढी महत्त्वाची आहे तरी का? कॅप्टन रोहितने सांगितलं मोठं कारण

Next Post

हे तर पाहिलंच पाहिजे! Vintage Rolls Royce चालवताना धोनी कॅमेऱ्यात कैद, रांचीतील व्हिडिओ जगभरात व्हायरल

Next Post
MS-Dhoni-Rolls-Royce

हे तर पाहिलंच पाहिजे! Vintage Rolls Royce चालवताना धोनी कॅमेऱ्यात कैद, रांचीतील व्हिडिओ जगभरात व्हायरल

टाॅप बातम्या

  • टीम इंडियाची ‘गोल्डन बॉय’ नीरजसोबत ग्रेट भेट! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
  • ‘अजूनतरी कोणताही…’, अक्षर पटेलच्या रिप्लेसमेंटवर कोच द्रविडची मोठी प्रतिक्रिया
  • वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याने संतापला तमिम, बोर्डावर लावले गंभीर आरोप, वाचा सविस्तर
  • दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
  • ड्रिंक्स देणाऱ्या पोरांच्या हाती सोपवली टीम इंडियाने विजयाची ट्रॉफी! रोहित-राहुलचे होतेय कौतुक
  • बीसीसीआयने पाळला दिलेला शब्द! पर्यावरण संवर्धनासाठी लावली तब्बल इतकी झाडे
  • बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप! वर्ल्डकप आधीच कर्णधार शाकिबची निवृत्तीची घोषणा
  • ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! वर्ल्डकपपूर्वी ऐन मोक्याच्या क्षणी बाहेर झाला जबरदस्त खेळाडू, लगेच वाचा
  • अर्रर्र! बुमराहने 3 विकेट्स घेऊनही नावावर झाला लाजीरवाणा विक्रम, 6 वर्षांनंतर बूम बूमची खराब गोलंदाजी
  • चाहत्याचा शाहरुखला कोहलीबद्दल ‘तो’ प्रश्न; किंग खान म्हणाला, ‘माझं विराटवर खूप प्रेम, तो तर जावयासारखा…’
  • वर्ल्डकपसाठी नव्या-जुन्या खेळाडूंना घेत बलाढ्य संघांनी कसली कंबर! पाहा दहाच्या दहा Teamsचे Squad
  • भारतीय संघाला घाम फोडणाऱ्या ‘त्या’ दोघांना कमिन्सने दिले विजयाचे श्रेय; म्हणाला, ‘त्यांच्यामुळे…’
  • ‘इथल्या लोकांनी आमचे…’, विश्वचषकासाठी भारतात दाखल झाल्यानंतर बाबर आणि रिझवानची लक्षवेधी प्रतिक्रिया
  • CWC23: तब्बल 7 वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल, हैदराबाद विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल
  • अखिल भारतीय एसएनबीपी स्पर्धेत १५ राज्यांचा सहभाग, महिला हॉ़की स्पर्धेत ८ संघ
  • मालिका जिंकल्यानंतर रोहित वैयक्तिक प्रदर्शनावर खुश! विश्चचषक संघाबाबत दिली खास प्रतिक्रिया
  • तूच खरा लीडर! पराभवानंतरही रोहितच्या ‘त्या’ कृतीने जिंकले सर्वांचे मन
  • अखेरच्या वनडेत टीम इंडियाचा दारूण पराभव! ऑस्ट्रेलियाचा सांघिक कामगिरीच्या जोरावर शानदार विजय
  • BREAKING! आयपीएलमध्ये विराटशी पंगा घेणाऱ्या नवीनने केली वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
  • कमबॅकसाठी केन विलियम्सन तयार! सराव सामन्याआधी दिली खास प्रतिक्रिया
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In