इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स सध्या आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळत आहे. सीएसकेला हंगामातील त्यांचा चौथा सामना बुधवारी (12 एप्रिल) राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळायचा आहे. तत्पूर्वी स्टोक्सची खास प्रतिक्रिया समोर आली आहे. यात ऍशेस 2023 साठी इंग्लंडच्या रणनीतीविषयी स्टोक्सने खुलासा केला.
बेन स्टोक्स (Ben Stokes) याने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड संघ आगामी ऍशेस मालिकेत आपल्या फलंदाजीच्या रणनीतीमध्ये बदल करणार नाहीये. मागच्या वर्षी इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून स्टोक्स आणि इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम (Brendon McCullum) यांनी जबरदस्त कामगिरी केली. मागच्या 12 कसोटी सामन्यांपैकी 10 सामन्यांमध्ये इंग्लंडला विजय मिळवून देण्यात स्टोक्स आणि मॅक्युलम जोडीये योगदान महत्वाचे राहिले आहे. स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडच्या फलंदाजंनी कोसटी क्रिकेटमध्ये अगदी वनडे आणि टी-20 क्रिकेटसारखी फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. परिणामी विरोधी संघाच्या गोलंदाजांवर दबाव आला आणि बहुतांश वेळा विरोधी संघ पराभूत झाला. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या फलंदाजीमध्ये आगामी ऍशेसमध्येही कुठला बनदल दिसणार नाही.
इंग्लिश कर्णधाराने सांगितल्याप्रमाणे 16 जून रोजी सुरू होणाऱ्या ऍशेसमध्ये वेगवान गोलंदाजांची तगडी फौज घेऊन उतरणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाकथीत स्टोक्स म्हणाला, “माझी इच्छा असती, तर 20 खेळाडूंचा संघही निवडला असता. पण मी मेडिकल टीमला सांगितले की, मला त्यांनी मला निवडण्यासाठी आठ गोलंदाज उपलब्ध करून द्यावेत. यावर्षी सामना खूप जवळचा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यासाठी आमच्याकडे गरजेच्या सर्व गोष्टी असाव्या, असे मला वाटते. आम्ही नशीबवान आहोत की, निवड प्रक्रियेसाठी आमच्याकडे निवडण्यासाठी चांगले खेळाडू आहेत. कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरायचे, हे मला माहिती आहे.”
दरम्यान, इंग्लंडच्या गोलंदाची आक्रमाणाचा विचार केला, तर अनुभवी जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर, मार्क वूड आणि ओली स्टोन असे काही घातक गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. ऑस्ट्रेलियन संघासाठी इंग्लंडचे हे गोलंदाजी आक्रम नक्कीच अढचण उभी करू शकते. स्टोक्सचे चालू आयपीएलमधील प्रदर्शन पाहिले, तर पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने 15 धावा केल्या आहेत. सोबतच लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एका सामन्यात त्याने एकाच षटकात 18 धावा खर्च केल्या. मुंबईविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे स्टोक्स खेळू शकला नव्हता. (Ben Stokes’ strategy for Ashes 2023 is ready)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिट असूनही स्टोक्स खेळणार नाही! चेन्नई-राजस्थान सामन्याआधी माजी दिग्गजाची भविष्यवाणी
“माझे स्वप्न पूर्ण झाले”, दिल्लीला पराभूत केल्यानंतर तिलक वर्माने दिली भावनिक प्रतिक्रिया