भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या आज दुसरा दिवस आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाजांनी नांगी टाकली. यामुळे इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २०५ धावांवर आटोपला. पहिल्या डावात बेन स्टोक्स (५५) आणि डॅनियल लॉरेन्स (४६) यांना वगळता कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यानंतर आता अर्धशतकीय खेळी केलेल्या स्टोक्सने या मालिकेबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
संघाचे मुख्य फलंदाज गारद झाल्यानंतर, स्टोक्सने संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली. परंतु त्याला मोठी आकडी खेळी खेळण्यास अपयश आले. पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर तो म्हणाला, “मी आतापर्यंत ७० च्या आसपास कसोटी सामने खेळलो आहे. यादरम्यान एक फलंदाज मी पूर्ण जगात खेळलो आहे. पण एक फलंदाज म्हणून मी इतक्या कठीण परिस्थितीत कधीच खेळलो नाही. मी खूप दुखी आहे की, चांगली सुरुवात मिळाली असतानाही मी बाद झालो. अर्धशतक म्हणजे खूप जास्त धावा नसतात, अर्धशतक तुम्हाला कसोटी सामन्यात विजय मिळवून देऊ शकत नाही”
बाद झाल्यामुळे दु:खी आहे
पुढे स्टोक्सने म्हटले, “मी खूप दु:खी आहे. मी त्या खेळपट्टीवर चेंडू सहजरीत्या खेळून काढत होतो. परंतु शेवटी मी अशाप्रकारे बाद झालो. अडीच तास खेळपट्टीवर टिकून राहिलो आणि एवढे कठीण चेंडू खेळून काढले, नंतर त्याच चेंडूवर बाद झालो. यामुळे मी खूप दु:खी आहे.”
इंग्लंडच्या फलंदाजांना आले अपयश
भारतीय संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंड संघाचा डाव अवघ्या २०५ धावांवर संपवला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना , अक्षर पटेलला ४ गडी बाद करण्यात यश आले तर अश्विनला ३, सिराजला २ आणि सुंदरला १ गडी बाद करण्यात यश आले. इंग्लंड संघाकडून फलंदाजी करतांना स्टोक्स ने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली; तर लॉरेंस ने ४६ धावा केल्या. तसेच सलामीला आलेले सिब्ले आणि क्रावली हे लवकर माघारी परतले. तसेच कर्णधार रूट अवघ्या ५ धावा करत माघारी परतला.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG 4th Test Live: टीम इंडियाला लागोपाठ २ धक्के, चेतेश्वर पुजारानंतर विराट कोहली स्वस्तात बाद
ओ भाई चल फूट!! भर सामन्यात समालोचन करताना संतापले गावसकर, व्हिडिओ होतोय व्हायरल
“विसरु नकोस, भारताकडे राहुल-मयंक आहेत” सातत्याने फ्लॉप ठरत असलेल्या शुबमनला दिग्गजाची चेतावणी