इंग्लंडचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार बेन स्टोक्स याने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मंगळलवारी खेळलेलल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर बेन स्टोक्सने विशेष प्रतिक्रिया देली. यावेळी त्याने भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विरट कोहलली याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने विराट कोहलीची स्तुती केली असून, मैदानावरील त्याच्या उर्जेची आणि वचनबद्धतेची त्याने नेहमीच प्रशंसा केली आहे. स्टोक्सने सोमवारी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर कोहलीने त्याला त्याचा “सर्वात प्रतिस्पर्धी” खेळाडू म्हंटले.
स्टोक्सने ‘स्काय स्पोर्ट्स’ला सांगितले की, ”विराट क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील महान खेळाडूंपैकी एक राहील. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध खेळताना मला खूप आनंद होतो.”
“मी नेहमीच त्याची उर्जा आणि खेळाप्रती बांधिलकीची प्रशंसा केली आहे. त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध खेळणे म्हणजे काय ते कळते. फक्त तुमच्यासाठीच नाही तर वरच्या स्तरावर खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी.” तो पुढे म्हणाला की, “मला खात्री आहे की आम्ही मैदानावर एकमेकांविरुद्ध आणखी खेळू. विराटचे विचार ऐकून आनंद झाला.”
विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. कोहलीचे शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये झाले होते. तेव्हापासून भारताचा माजी कर्णधार आपल्या ७१व्या शतकाची आतुरतेने वाट पाहत आहे. इंग्लंड दौऱ्यावरही कोहलीची बॅट शांत राहिली. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न झाल्याने कोहली आता महिनाभर क्रिकेट क्षेत्रापासून दूर राहणार आहे. त्यानंतर जेव्हा विराट पुनरागमन करेल तेव्हा तो मानसिक रित्या दबाव झेलण्यासाठी तयार असेल असे काही क्रिकेट जाणकारांचे मत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी संघात असतो तर तीन वेळा…’, श्रीसंतने विराट कोहलीला विश्वचषकावरून हिणवले
शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघ त्रिनिदादमध्ये दाखल, इंग्लंडनंतर वेस्ट इंडीजलाही चारणार धूळ
लॉर्ड्सवर पुजाराची कॅप्टन्स इनिंग! ठोकले नाबाद शतक; वॉशिंग्टनचे ‘सुंदर’ पदार्पण