लंडन। रविवारी(14 जूलै) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या नाट्यपूर्ण अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरी सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांमुळे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे इंग्लंडचे 44 वर्षांनंतर विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण झाले.
स्टोक्सने इंग्लंडच्या या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची आवस्था 23.1 षटकात 86 धावात 4 विकेट अशी असताना 98 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या होत्या. तसेच जॉस बटलरबरोबर 110 धावांची पाचव्या विकेटसाठी भागीदारी केली होती.
त्याचबरोबर त्याने सुपर ओव्हरमध्येही बटलर बरोबर फलंदाजी करताना 8 धावाही केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
पण स्टोक्स इंग्लंडकडून खेळला असला तरी त्याचे वडील या सामन्यात न्यूझीलंडला पाठिंबा देत होते. कारण स्टोक्सचे कुटुंब काही वर्षांपूर्वी न्यूझीलंडमधून इंग्लंडला स्थायिक झाले होते. तसेच स्टोक्सचा जन्म 4 जून 1991 ला न्यूझीलंडमध्येच झाला आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील 11 वर्षे ख्राईस्टचर्च येथे व्यतित केली आहेत.
पण त्यानंतर स्टोक्स 12 वर्षांचा असताना त्याचे वडील गेरार्ड यांचा वर्किंग्टन टाउन रग्बी लीग क्लबसाठी रग्बी प्रशिक्षक म्हणून करार झाला. त्यावेळी स्टोक्स कुटुंबाबरोबर इंग्लंडला वास्तव्यास आला.
त्यानंतर स्टोक्सने इंग्लंडमध्येच त्याच्या क्रिकेटला सुरुवात केली आणि तो इंग्लंडमध्येच स्थायिक झाला. पण 2013 नंतर त्याचे आई-वडील पुन्हा ख्राईस्टचर्चला येऊन स्थायिक झाले. तर स्टोक्स इंग्लंडमध्येच थांबला.
त्यामुळे गेरार्ड यांनी ते 2019 विश्वचषकासाठी न्यूझीलंडला पाठिंबा देत असल्याचे stuff.co.nz ला सांगितले. तसेच त्यांनी हे देखील सांगितले की जरी ते न्यूझीलंडला पाठिंबा देत असले, तरी त्यांच्या मुलाच्या यशामुळे ते आनंदी आहेत.
ते म्हणाले, ‘न्यूझीलंडसाठी मी खूप निराश आहे. एका संघाला ट्रॉफीशिवाय परतणे हे खूप दुखद आहे. पण मी बेन आणि त्याच्या संघासाठी खूप आनंदी आहे पण तरीही मी अजून न्यूझीलंडचाच समर्थक आहे.’
तसेच ते म्हणाले, ‘बेनला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. त्यालाही न्यूझीलंडचे वाईट वाटत आहे. पण तो न्यूझीलंडमधून आला आहे म्हणून नाही तर न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या काय भावना असतील असा विचार करुन. ते खूप चांगला संघ आहेत. दोन्ही संघ एकमेकांचा आदर करतात.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ऋतुराज गायकवाड, नवदीप सैनीची वेस्टइंडीज विरुद्ध शानदार कामगिरी
–विंडीज दौऱ्यासाठी या दिवशी होणार टीम इंडियाची निवड; धोनीच्या भविष्याबाबत सस्पेन्स कायम
–विश्वचषकानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत या भारतीय खेळाडूंचा बोलबाला कायम