यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय खेळी सुरू करणारे पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री मनोज तिवारी यांना क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या ३९ संभाव्य क्रिकेटपटूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. बंगालचे माजी कर्णधार राहिलेल्या तिवारी यांनी मार्च २०२० मध्ये सौराष्ट्राविरुद्ध आपला अखेरचा रणजी करंडक सामना खेळला होता.
शिवपूरमधून निवडणूक जिंकल्यानंतर मनोज तिवारी म्हणाले होते की, ‘मी माझी तंदुरुस्ती कायम राखेल. बंगालकडून आणखी काही काळ खेळण्यास नकार देऊ शकत नाही.’ त्यानंतर त्यांच्यावर ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडामंत्री ही जबाबदारी टाकण्यात आली.
तंदुरुस्ती शिबिरासाठी झाली निवड
बंगालमधील वरीष्ठ संघाचे तंदुरुस्ती शिबिर २३ जुलैपासून सुरू होणार आहे. मनोज तिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील खेळले आहेत. त्यांनी १२ वनडे सामन्यात १ शतक आणि १ अर्धशतकाच्या मदतीने २८७ धावा केल्या होत्या. लेगस्पिन गोलंदाजी करत १२ बळीही घेतलेले. त्याचबरोबर ३ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी १५ धावा केलेल्या. जुलै २१५ मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यानंतर यांना भारतीय संघाची जशी घालण्याची संधी मिळाली नाही.
दमदार प्रथमश्रेणी कारकीर्द
मनोज तिवारी यांची प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी राहिली असून त्यांच्या नावे ८००० पेक्षा जास्त धावा जमा आहेत. त्यांनी १२५ सामन्यात ५० च्या सरासरीने ८९५० धावा केल्या. यात २५ शतके आणि ३७ अर्धशतके असून नाबाद ३०३ त्याची सर्वात मोठी धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटविषयी बोलायचे झाल्यास, मनोज तिवारी यांनी १६३ सामन्यात ४२ च्या सरासरीने ५४६६ धावा केल्या. ६ शतके आणि ४० अर्धशतके ठोकली. सोबत ६० बळीही घेतले आहेत.
आयपीएलमध्ये केली प्रभावी कामगिरी
मनोज तिवारी यांनी आयपीएलच्या १० हंगामामध्ये आपला खेळ दाखवला. ते २००८ ते २०१८ पर्यंत आयपीएल खेळले. या दरम्यान त्यांनी ९८ सामन्यांत २९ च्या सरासरीने १६९५ धावा केल्या. यात ७ अर्धशतकांचा समावेश आहे. ते कोलकाता नाईट रायडर्ससोबत दोन वेळा आयपीएल विजेतेदेखील राहिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शतक करण्याचा विचार मनात आल्यानंतरही नाबाद राहण्यावर का केले फोकस? शिखर धवनने केला खुलासा
श्रीलंका वि. भारत दुसरा वनडे सामना कोठे आणि कधी होणार? जाणून घ्या सर्वकाही