प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १८ तारखेला प्रो कबड्डीचा १२७ वा सामना पुणेरी पलटण आणि बेंगाल वॉरियर्स यांच्यात झाला. बेंगाल वॉरियर्सने सामन्यात दमदार पुनरागमन करत ४३-३६ च्या अंतराने हा सामना जिंकला आहे. सामन्याच्या पहिल्या हाफपर्यंत बेंगालचा संघ पुणेपेक्षा १० गुणांनी मागे होता.
The defending champions leave the mat with their pride 🤩
Stellar comeback from the Super-Mani & Co. ⚡ #BENvPUN #SuperhitPanga #VIVOProKabaddi pic.twitter.com/SMnPbYqgux
— ProKabaddi (@ProKabaddi) February 18, 2022
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत २१ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १५ सामने जिंकत ८१ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ दबंग दिल्ली संघ ७० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच यूपी योद्धा (६८ गुण), बेंगलुरू बुल्स (६६ गुण) आणि हरियाणा स्टिलर्स (६३ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
उपांत्य फेरीचे स्वप्न घेऊन मोहन बागान मैदानावर उतरणार; केरला ब्लास्टर्सला कडवी टक्कर देणार
असं कोण धावबाद होतं! हरमनप्रीत कौर अतिशय सहज पद्धतीने रनआऊट, झाली प्रचंड ट्रोल
राज्यस्तरीय वरिष्ठ गट ज्यूदो स्पर्धा: पिडीजेएला पुरूष गटाचे विजेतेप