प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वी धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या २२ व्या दिवशीचा (१२ जानेवारी) दुसरा सामना दबंग दिल्ली आणि बेंगलुरू बुल्स संघात झाला. या सामन्याच्या पहिल्या हाफमध्येच बेंगलुरूने दिल्लीवर १६ अंकांची आघाडी घेतली होती. ते पहिल्या हाफमध्ये २७-११ ने आघाडीवर होते. पुढे दिल्लीच्या कबड्डीपटूंचा बेंगलुरूच्या या आघाडीला पार करता आले नाही आणि त्यांनी ६१-२२ च्या मोठ्या फरकाने सामना गमावला.
Delhi face a crushing defeat against Bengaluru Bulls.💥👇#PKL #PKL8 #Kabaddi #ProKabaddiLeague #sports #VivoProKabaddiLeague #vivoprokabaddiisback pic.twitter.com/d1atswaPpk
— Khel Now (@KhelNow) January 12, 2022
पहिला सामना सुटला बरोबरीत
तत्पूर्वी या दिवशीचा पहिला सामना ‘हरियाणा स्टिलर्स’ आणि ‘यूपी योद्धा’ संघात झाला. या सामन्यात उभय संघांमध्ये विजयासाठी शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. परंतु अखेरीस हा सामना ३६-३६ ने बरोबरीत सुटला.
हरियाणा विरुद्ध यूपी संघांमध्ये झालेल्या सामन्याच्या पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघ बरोबरीच्या लढतीत होते. यूपीने एका गुणाची सरसी घेत पहिल्या हाफपर्यंत खेळ १४-१३ अशा स्थितीत आणला होता. पुढे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी हा सामना बरोबरीत सुटला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: ‘हरियाणा स्टिलर्स’ अन् ‘यूपी योद्धां’मधील चित्तथरारक सामना संपला बरोबरीत
हैदराबादला पराभूत करून अव्वल चौघांत एन्ट्री मारण्याचे चेन्नईयनचे लक्ष्य!
हेही पाहा-