बंगळुरू, २७ जानेवारी: बंगळुरू एफसी आणि चेन्नईयन एफसी हे दोन्ही संघ आता हिरो इंडियन सुपर लीगमध्ये २०२२-२३ ( आयएसएल) तीन गुण मिळवून आपापलं आव्हान कायम राखण्याच्या प्रयत्नात आहेत. प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्याच्या दृष्टीने दोघांनाही विजय मिळवणे आवश्यक आहे आणि शनिवारी बंगळुरूच्या श्री कांतीरावा स्टेडियमवर उभय संघांमध्ये सामना होणार आहे. बंगळुरू एफसी ३ गुणांच्या फरकाने सहाव्या स्थानाच्या पिछाडीवर आहेत, तर चेन्नईयन एफसीच्या खात्यात १७ गुण आहेत. बंगळुरूने उद्या विजय मिळवल्यास त्यांची आणि सहाव्या स्थानावरील ओडिशा एफसी यांच्या गुणांची संख्या २२ अशी बरोबरीची होईल.
मोक्याच्या क्षणी बंगळुरू एफसीने त्यांचा खेळाचा दर्जा उंचावला आहे आणि त्यांनी मागील तीन सामने जिंकले आहेत. मागील आठवड्यात बंगळुरूने ३-० अशा फरकाने जमशेदपूर एफसीचा पराभव केला होता. यंदाच्या हंगामातील उर्वरित लढतीच्या तुलनेत मागील तीन सामन्यांत त्यांनी गोल संख्याही दुप्पट केली आहे. तीन सामन्यांत त्यांनी ८ गोल केले आहेत आणि प्रतिस्पर्धींना केवळ दोन गोल करू दिले आहेत.
मुख्य प्रशिक्षक सायमन ग्रेसन हे संघाचा स्टार आक्रमणपटू रॉय कृष्णा याचा फॉर्म परतल्याने आनंदी आहेत. त्याने यंदाच्या पर्वात चार गोल केले आहेत आणि यापैकी दोन गोल हे मागील दोन सामन्यांत आले आहेत. ”दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. या आठवड्यातील आणि पुढील आठवड्यातील लढती महत्त्वाच्या आहेत आणि त्याने लीगच्या अंतिम टप्प्याचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जे आमच्या हातात आहे, ते करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मागील तीन लढती आम्ही जिंकल्या आहेत आणि त्याच आत्मविश्वासाने आम्ही मैदानावर उतरणार आहोत,”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलमध्ये नेणारी धडाकेबाज श्वेता! 146 च्या सरासरीने ठोकल्यात धावा
नोवाक जोकोविचला मोठा विक्रम रचण्याची संधी, नदालचा रेकॉर्ड धोक्यात