भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए, NCA) लवकरच बंगळुरू येथे उद्घाटन होणार आहे. एका वृत्तानुसार, नवीन अकादमीचे उद्घाटन 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. या संदर्भात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राज्य क्रिकेट संघटनांना ई-मेलद्वारे नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका वृत्तामध्ये असे म्हटले होते की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन एनसीएचे उद्घाटन करण्यासाठी येऊ शकतात.
जय शाह (Jay Shah) यांनी राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, ‘मला आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे आहात. 28 सप्टेंबर 2024 रोजी बंगळुरूमधील नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनासाठी तुम्हाला आमंत्रण पाठवताना आम्हाला आनंद होत आहे.’
नवीन एनसीएमध्ये 3 जागतिक दर्जाची क्रिकेट मैदाने, सरावासाठी 45 खेळपट्ट्या, इनडोअर क्रिकेट खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. याशिवाय ऑलिम्पिक खेळांच्या आकाराचा जलतरण तलाव तयार करण्यात आला आहे. तर रिहॅब आणि क्रीडा विज्ञानाशी संबंधित अनेक सुविधा येथे उपलब्ध असतील. ही नवीन अकादमी नवोदित आणि आगामी क्रिकेटपटूंना सर्वोत्तम वातावरणात प्रशिक्षणाचा अनुभव देईल. या मोहिमेला सर्वांचा पाठिंबा अतुलनीय आहे, असे ईमेलमध्ये पुढे लिहिले आहे. या नवीन अकादमीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी प्रत्येकजण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढेल अशी आशा जय शहा यांनी व्यक्त केली.
नवीन अकादमीचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येऊ शकतात. बीसीसीआयची वार्षिक बैठक उद्घाटनाच्या एक दिवसानंतर होणार आहे. मात्र, अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही. दरम्यान, वार्षिक सभेत नव्या सचिवाच्या चर्चा होणार नसली तरी, इतर अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्या विजयासाठी कानपूर कसोटीत ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे संधी, मांजरेकरांची मागणी
IND vs BAN: दुसऱ्या सामन्यातही विजय फिक्स? कानपूरच्या मैदानावर भारताची आकडेवारी शानदार
IND vs BAN: पराभवानंतर बांगलादेशला दुसरा झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू होणार बाहेर?