चेन्नई कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाची नजर 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याने असणार आहे. बांगलादेशविरुद्धचा हा कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकत यजमान संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आपला दावा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दरम्यान या सामन्यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी निवड समितीकडे मोठी मागणी केली आहे. कानपूर कसोटीसाठी कुलदीप यादवला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळायला हवी, अशी मागणी मांजरेकरांनी केली आहे.
ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना संजय मांजरेकर यांनी संघ व्यवस्थापनाला आवाहन केले आहे की, कानपूरच्या कसोटीत एका वेगवान गोलंदाजाला बाहेर ठेवून कुलदीप यादवला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळावी. चेन्नईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करत असली तरी वेगवान गोलंदाजाच्या जागी कुलदीपला खेळवले असते तर बांगलादेशच्या अडचणी वाढल्या असत्या, असे मांजरेकरांचे मत आहे.
माजी क्रिकेटपटू संजयच्या मते, कुलदीपला न खेळवल्याने भारताने अनेक संधी गमावल्या. मला वाटतं कुलदीप यादवला इतक्या सहजासहजी वगळता येणार नाही. भारतीय खेळपट्ट्यांवर सीमर्सना एक किंवा दीड दिवस मदत मिळते. यानंतर फिरकीपटूंचा खेळ सुरू होतो. कुलदीप यादवसारखा गोलंदाज तुमच्याकडे असताना त्याला संधी द्यायला हवी.
दरम्यान चेन्नई कसोटी जिंकल्यानंतर लगेचच बीसीसीआयने कानपूर कसोटीसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. संघात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, संघ व्यवस्थापन जसप्रीत बुमराहला विश्रांती देईल, असे मानले जात होते, मात्र तसे झाले नाही. कुलदीप यादवलाही भारतीय संघात स्थान मिळाले असून कानपूरची खेळपट्टी पाहून प्रशिक्षक आणि कर्णधार त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान देऊ शकतात, असे मानले जात आहे.
कानपूर कसोटीसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, आकाश. , जसप्रीत बुमराह, यश दयाल
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN: दुसऱ्या सामन्यातही विजय फिक्स? कानपूरच्या मैदानावर भारताची आकडेवारी शानदार
IND vs BAN: पराभवानंतर बांगलादेशला दुसरा झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू होणार बाहेर?
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे बुमराहबद्दल मोठे वक्तव्य