Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! भारताचे प्रतिनिधित्व करणारे पुण्याचे पहिले हॉकीपटू बूडल यांचे निधन, क्रीडाविश्वावर शोककळा

November 8, 2022
in टॉप बातम्या, हॉकी
Benny-Boodle

File Photo


पुणे: माजी हॉकीपटू, अधिकारी आणि प्रशासक बेंजामिन जेम्स बूडल यांचे मंगळवारी (दि. 08 नोव्हेंबर) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी फ्लोरेन्स, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने क्रीडाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनामुळे हॉकी विश्वावर शोककळा पसरली आहे.

क्रीडा वर्तुळात बूडल बेनी (Benny) म्हणून ओळखले जायचे. हॉकीपटू म्हणून बेनींची कारकीर्द विद्यापीठ स्पर्धेपासून सुरू झाली होती. बेनी यांनी 50च्या दशकात श्रीलंकेत झालेल्या द्विपक्षीय विद्यापीठ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. भारताचे प्रतिनिधित्व करणारे बेनी हे पुण्याचे पहिले खेळाडू होते.

@TheHockeyIndia Very sad to hear former Maharashtra Hockey Association secretary, Benny Boodle passed this morning in Pune. The funeral is to be held on November 9, Hadpasar cemetery at 3 pm

— Joe Williams (@JoeWill13958598) November 8, 2022

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर बेनी सुल्तान अझलन शहा चषक स्पर्धेचे निरीक्षक होते. हैदराबाद आणि जम्मू येथे झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतही त्यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. तत्कालिक महाराष्ट्र हॉकी संघटनेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अखिल भारतीय स्तरावरील बाबासाहेब आंबेडकर हॉकी समितीचे ते अध्यक्ष राहिले होते.

कुमार राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत खेळणारे ते सर्वात तरुण खेळाडू होते. महाराष्ट्र संघाचे कर्णधारपदही त्यांनी भूषविले होते. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली. बेनी यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि. 09 नोव्हेंबर) दुपारी 3.30 वाजता हडपसर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Benny Boodle passed away)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागच्या हंगामात दिल्लीने ‘या’ खेळाडूंना बनवले करोडपती, पण पठ्ठ्यांनी दीड दमडीचीही केली नाही कामगिरी
डिविलियर्सला गली क्रिकेट खेळताना पाहिलंय का? नसेल, तर ‘हा’ व्हिडिओ एकदा पाहाच


Next Post
European-Cricket

व्हिडिओ: युरोपियन क्रिकेटमध्ये गोलंदाजाने केल्या दोन मोठ्या चुका; पाहून तुम्हीही म्हणाल, 'कोंबडी पकड'

South-Africa-T20-League-Tournament

मोठी घोषणा! दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये टी20 लीगची सुरुवात, आयपीएलच्या 6 फ्रँचायझींनी उतरवले आपले संघ

England-Cricket-Team

दुखापती इंग्लंडचा पिच्छा सोडेना! मलानपाठोपाठ 'हा' वेगवान गोलंदाजही झाला जखमी, भारताचे टेन्शन मिटले

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143