ऍडलेड। भारताने आज(15 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी तर एमएस धोनीने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला आहे.
त्यामुळे वनडेत या दोघांची धावांचा यशस्वी पाठलाग करतानाची सरासरी ही 99 पेक्षाही अधिक झाली आहे. यात धोनीची सरासरीने ही 99.85 आहे, तर कोहलीची 99.04 अशी आहे.
त्यामुळे वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये (कमीतकमी 25 डाव खेळलेल्या) हे दोघे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
धोनीने आज या सामन्यात 54 चेंडूत 101.85 च्या सरासरीने नाबाद 55 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 2 षटकार मारले आहेत. तसेच विराटने 112 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.
या दोघांनी मिळून या सामन्यात चौथ्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारीही केली आहे.
वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी असणारे क्रिकेटपटू (कमीतकमी 25 डाव खेळले क्रिकेटपटू)-
99.85 – एमएस धोनी
99.04 – विराट कोहली
86.25 – मायकल बेवन
82.77 – एबी डिविलियर्स
77.80 – जो रुट
महत्त्वाच्या बातम्या-
–ऍडलेड ठरले विराट कोहलीसाठी लकी
–शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात विराट सचिनला सरस