भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध रविवारी तिसऱ्या कसोटी सामन्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 137 धावांनी विजय मिळवून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या शाब्दीक चकमकीची चांगलीच चर्चा झाली. त्यातील भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यांच्यातील मजेदार संवाद तर चांगलाच गाजला होता.
पण हे स्लेजिंग फक्त सामन्यापुरतेच मर्यादीत होते, हे सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंनी दाखवून दिले आहे. पंतने पेनच्या मुलांबरोबर आणि पत्नीबरोबर फोटो काढला आहे. हा फोटो पेनची पत्नी बोनी पेनने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या स्टोरीला तिने ‘बेस्ट बेबीसिटर’ असे कॅप्शन दिले आहे.
झाले असे की मेलबर्न कसोटीत पेन पंतला स्लेजिंग करताना म्हणाला होता की तू माझ्या मुलांना सांभाळ म्हणजे मी माझ्या पत्नीला घेउन चित्रपट पहायला जाईल. पंतनेही पेनची ही इच्छा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पूर्ण केल्याचे दिसून आले आहे.
मंगळवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी दोन्ही संघाच्या खेळाडूंना आमंत्रित केले होते.
Tim Paine to @RishabPant777 at Boxing Day Test: "You babysit? I'll take the wife to the movies one night, you'll look after the kids?"
*Challenge accepted!* 👶
(📸 Mrs Bonnie Paine) pic.twitter.com/QkMg4DCyDT
— ICC (@ICC) January 1, 2019
मेलबर्न कसोटीदरम्यान पंत आणि पेनमध्ये काय झाला होता संवाद-
पंत आणि पेन यांच्यातील संवाद स्टंप माईकमधून ऐकू आला होता. पहिल्यांदा पेन पंतला स्लेज करताना म्हणाला होता की ‘एमएस धोनी वनडे संघात परत आला आहे. त्यामुळे तू बीबीएलमध्ये हॅरिकेन संघात खेळू शकतो. त्यांना फलंदाजाची गरज आहे.’
‘तूझा ऑस्ट्रेलियातील सुट्टीचा वेळही वाढेल. होबार्ट हे सुंदर शहर आहे. तूला शानदार आपार्टमेंटही मिळेल.’ तसेच तो पुढे म्हणाला, ‘तू माझ्या मुलांना सांभाळू शकतो का, जेणेकरुन मी माझ्या पत्नीला घेऊन चित्रपट पहायला जाऊ शकतो.’
Tim Paine doing some recruiting for the @HurricanesBBL out in the middle of the 'G… 😂 #AUSvIND pic.twitter.com/6btRZA3KI7
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2018
त्यानंतर पेनने केलेल्या स्जेजचा हिशोब चुकता करतना पंत यष्टीमागून पेनला डिवचताना दिसला. “कमऑन बाॅईज, आपल्याकडे एक खास पाहुणा आला आहे. तो काही करत नाही. मयांक तुला टेम्पररी कर्णधार माहीत आहे का? पेनचा हा स्पेशल अपरेन्स आहे. त्याला विशेष काही करता येत नाही. तो फक्त बडबड करतो. ” असे यावेळी पंत म्हणताना दिसला होता.
It was Rishabh Pant's turn for some fun on the stump mic today… #AUSvIND pic.twitter.com/RS8I6kI55f
— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–२०१८मध्ये वनडेत धावांचा रतिब घालणारे ५ फलंदाज
–२०१८ मध्ये कसोटी क्रिकेट गाजवणारे ५ गोलंदाज
–२०१८ वर्षांत कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज