---Advertisement---

तेंडुलकर ते सेहवाग, पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये गेलेल्या न्यूझीलंडवर दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव

On: गुरूवार, नोव्हेंबर 11, 2021 2:34 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर ५ विकेट्सने मात केली. यासह न्यूझीलंड संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने न्यूझीलंडसमोर १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंड संघाने हे लक्ष्य १९ षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले.

न्यूझीलंडकडून सलामीवीर डॅरिल मिशेलने नाबाद ७२ धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय डेव्हॉन कॉनवेने ४६ आणि जेम्स नीशमने २७ धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांनी, तसेच दिग्गज क्रिकेटपटूंनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. वीरेंद्र सेहवागने ट्विट करत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सामना असे म्हटले आहे.

वीरेंद्र सेहवागने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने म्हटले आहे की, ‘हा टी२० विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट सामना ठरला आहे. वा…! डॅरिल मिशेल, जेम्स नीशमने सामना फिरवला. या सनसनाटी विजयाबद्दल न्यूझीलंड संघाचे खूप खूप अभिनंदन.’ सेहवागने केलेल्या ट्विटला खूप पसंती मिळाली आहे.

तसेच सचिन तेंडुलकरनेही न्यूझीलंड संघाचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की ‘क्रिकेट काय मस्त खेळ आहे. न्यूझीलंडने पुन्हा एकदा मनं जिंकताना सामना जिंकला. मिशेलने शानदार खेळी केली; त्याला कॉनवे आणि नीशमने चांगली साथ दिली. बेअरस्टोबरोबर सीमारेषेवर जी घटना झाली, त्याने मला २०१९ चा अंतिम सामन्यात बोल्टबरोबर घडलेली घटना आठवली.’

याशिवाय देखील अनेक दिग्गजांनी न्यूझीलंडचे कौतुक केले आहे.

 

https://twitter.com/VVSLaxman281/status/1458493025168990210

https://twitter.com/MadanLal1983/status/1458535504178077697

https://twitter.com/DineshKarthik/status/1458504023615680513

या सामन्यात इंग्लडने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात १६६ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करतांना न्यूझीलंडची संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली, पण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने पहिल्याच षटकात गप्टिलला (४) झेलबाद केले. गप्टिलनंतर केन विल्यमसनलाही वोक्सने तिसऱ्या षटकात तंबूत धाडले.

या पडझडीनंतर डेव्हॉन कॉनवे आणि डॅरिल मिशेलने संघाला डाव सावरला. चौदाव्या षटकात कॉनवे बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या नादात कॉनवे यष्टीचीत झाला. त्याने ५ चौकार आणि एक षटकारासह ४६ धावा केल्या. सोळाव्या षटकात न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्सला गमावल्यानंतर जेम्स नीशम मैदानात आला. त्याने दबाव दूर करत फटकेबाजी केली. न्यूझीलंडला २४ चेंडूत ५७ धावांची गरज असताना नीशमने जॉर्डनला २३ धावा ठोकल्या.

अठराव्या षटकात नीशम बाद झाला. त्याने ११ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह २७ धावा केल्या. न्यूझीलंडला १२ चेंडूत २० धावांची गरज असताना मिशेलने ख्रिस वोक्सच्या १९व्या षटकात २० धावा ठोकल्या आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. मिशेलने ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७२ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहणारा न्यूझीलंड सातवा संघ; पाहा यापूर्वी कोणत्या ६ संघांनी केलाय हा कारनामा

इंग्लंड-न्यूझीलंड सेमीफायनलने घडवला इतिहास! दोन्ही संघाबाबत पहिल्यांदाच घडल्या ‘या’ गोष्टी

विलियम्सन आयसीसी स्पर्धेतील सर्वात यशस्वी ‘किवी कर्णधार’! न्यूझीलंडला ‘इतक्यांदा’ पोहचवलंय फायनलमध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---