वर्ष २०२१ आता संपले आहे. हे वर्ष देखील कोरोनामध्येच गेलं. परंतु यावर्षी अनेक मोठ मोठ्या स्पर्धा पार पडल्या. ज्यामध्ये काही खास क्षण घडले होते. काही क्षण असे होते ज्यामुळे डोळे पाणावले. तर काही क्षण असे होते ज्यांनी आपली मान अभिमानाने उंचावली. या सर्वांशिवाय, २०२१ वर्षात, असे काही मनोरंजक क्षण (क्रिकेटमधील सर्वात आनंदी घटना) देखील पाहायला मिळाले ज्यांनी नक्कीच चाहत्यांना नाचण्यास भाग पाडले. ( Best moments of 2021 in cricket)
१) ‘डॉग ऑफ द मंथ’ (dog of the month)
अशी घटना १४४ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडली असेल जिथे एक कुत्र्याला आयसीसीचा सर्वात मोठा पुरस्कार देण्यात आला. याच वर्षी अशी घटना घडली जिथे कुत्र्याला आयसीसीतर्फे ‘डॉग ऑफ द मंथ’चा पुरस्कार देण्यात आला. तर झाले असे की, आयर्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत महिलांचा क्रिकेट सामना सुरू होता. त्यावेळी चालू सामन्यात एका कुत्र्याने मैदानात प्रवेश केला आणि चेंडू तोंडात धरून मैदानात फिरत होता. त्यावेळी सर्व महिला खेळाडू त्या कुत्र्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावताना दिसून आले होते. शेवटी तो कुत्रा फलंदाजाजवळ जाऊन थांबला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
We have an additional Player of the Month winner this time ????#POTM | @cricketireland | @IrishWomensCric pic.twitter.com/UJjAadIxdA
— ICC (@ICC) September 13, 2021
२) दीपक चाहरने आपल्या प्रेयसीला केले प्रपोज :(Deepak chahar proposed his girl-friend)
तुम्ही मैदानात प्रेक्षकाने आपल्या प्रेयसीला प्रपोज केल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. परंतु एका क्रिकेटपटूने प्रेक्षकांमध्ये जाऊन आपल्या प्रेयसीला प्रपोज केल्याच्या घटना क्वचीतच पाहायला मिळत असतात. असाच काहीसा प्रक्रार आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात घडला होता. ज्यावेळी दीपक चाहरने सामना झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये जाऊन आपल्या प्रेयसीला प्रपोज केले होते. त्याने गुडघ्यावर बसून, फिल्मी स्टाईलमध्ये तिला मागणी घातली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
https://www.instagram.com/p/CUuthsjIPx_/?utm_medium=copy_link
३) लाईव्ह सामन्यात प्रेक्षकाची एन्ट्री :(jarvo entry in live cricket match)
काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी जार्वो ६९ नावाचा व्यक्ती मैदानात प्रवेश करत असल्याची घटना घडली होती, तर झाले असे की, लॉर्ड्स कसोटी सुरू असताना त्याने भारतीय संघाची जर्सी घातली आणि स्वतः भारतीय संघाचा खेळाडू आहे असे समजून तो मैदानात आला आणि क्षेत्ररक्षण सजवताना दिसून आला होता. त्यानंतर पुढील कसोटी सामन्यात तो सेक्युरीटी गार्डला चकवत पॅड घालून मैदानात उतरला आणि फलंदाजी करायला जाऊ लागला. त्यानंतर तो चक्क गोलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर गेला होता. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
Give me the energy/audacity of Jarvo 69 strolling straight onto the pitch at Lords and pointing at the Indian badge to back himself up https://t.co/p5A8ld5sTc
— Charlotte (@charlvtte) August 14, 2021
४) आयपीएल स्पर्धेत दिनेश कार्तिक आणि शिखर धवनची मस्ती :(shikhar dhawan and and dinesh kartik funny video)
आयपीएल २०२१ स्पर्धेदरम्यान शिखर धवन आणि दिनेश कार्तिकच्या फनी स्टाइलने चाहत्यांनाही नाचायला भाग पाडले. तर झाले असे की, केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान जेव्हा शिखर धवन खेळपट्टीवर फलंदाजी करत होता, त्यावेळी दिनेश कार्तिकने त्याला यष्टीचीत केले आणि शिखर धवनकडे पाहून “तू बाद आहेस.” असे म्हटले. त्यावेळी शिखर धवन देखील लहान मुलांसारखा आग्रह करताना दिसून आला होता. या दोघांची मस्ती पाहून, चाहते ही भलतेच खुश झाले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
Never a dull moment when @SDhawan25 is on the field. ???? @DineshKarthik ????????????????https://t.co/GDR4bTRtlQ #DCvKKR #VIVOIPL pic.twitter.com/lwohB8NNou
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2021
५)ख्रिस गेलने फलंदाजाला बाद करताच मारली मिठी :(Chris Gayle and Mitchell marsh viral video)
याच वर्षी ख्रिस आणि मिचेल मार्श या दोघांमध्ये अशी घटना घडली ज्यामुळे,चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. ही घटना टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत घडली होती. तर झाले असे की, वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यात ख्रिस गेलने मिचेल मार्शला बाद केले होते. त्यावेळी मिचेल मार्श पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना ख्रिस गेलने मागून येऊन त्याला मिठी मारली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
Chris Gayle thanks Mitch Marsh for his final T20 International wicket ???? #t20worldcup2021 pic.twitter.com/aGPKO8m8Si
— Steve Allen (@ScubaStv) November 6, 2021
महत्वाच्या बातम्या :
युवा अफगाण फलंदाजाने केली भारताच्या ‘दादा’ गोलंदाजांची धुलाई; एकाच षटकात बदलून टाकले आकडे
तब्बल १४४ वर्षांच्या इतिहासात केवळ भज्जीनेच केलाय हा विक्रम; १० वर्षात कोणी पोहचले नाही आसपास
हे नक्की पाहा: टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं |






