इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील पहिली दोन सामने दक्षिण आफ्रिका संघाने जिंकले. मात्र, तिसऱ्या वनडेत इंग्लंड कडवी झुंज देत सामना खिशात घातला. इंग्लंडने हा सामना 59 धावांनी जिंकला. मात्र, दक्षिण आफ्रिकेने ही मालिका 2-1ने आपल्या नावावर केली. असे असले, तरीही इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने या सामन्यात दमदार गोलंदाजी करत खास कारनामा करून दाखवला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 346 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाचा डाव 43.1 षटकात 287 धावांवर संपुष्टात आला. यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 9.1 षटके गोलंदाजी करताना 40 धावा देत 6 विकेट्स आपल्या नावावर केल्या. यासह त्याने त्याच्या वनडे कारकीर्दीतील विकेट्सचे पहिले पंचक पूर्ण केले.
So great to see @JofraArcher back at his best in an @englandcricket shirt! 🦁
Proud of you, Jof! 🙌6️⃣ pic.twitter.com/Xpd7LXl4tl
— Insignia Sports (@Insignia_Sports) February 2, 2023
या कामगिरीमुळे आर्चरने खास कारनामा केला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) त्यांच्याच देशात खेळताना सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मान मिळवला. तो या यादीत अव्वलस्थानी पोहोचला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच देशात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा( Pakistani cricketer) वसीम अक्रम (Wasim Akram) आहे. त्याने 1993मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच देशात फक्त 16 धावा देत 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. यानंतर तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा (Team India) फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आहे. त्याने 2018मध्ये दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 22 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी इंग्लंड संघाचा जेम्स एँडरसन (James Anderson) आहे. त्याने 2009मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच देशात खेळताना 23 धावा देत 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. (England vs South Africa ODI 3rd series top bowler against SA in SA)
वनडेत दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी करणारे खेळाडू
6/40 – जोफ्रा आर्चर (2023)*
5/16 – वसीम अक्रम (1993)
5/22 – युझवेंद्र चहल (2018)
5/23 – जेम्स एँडरसन (2009)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इकडं शुबमनने शतक ठोकलं अन् तिकडं विराटकडून आली जगातली भारी रिऍक्शन, फोटो शेअर करत म्हणाला…
मोठी बातमी! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतून कार्तिकचे ‘पदार्पण’, स्वत:च ट्वीट करत दिली खुशखबर