ऑस्ट्रेलिया संघाकडून रविवारी (11 फेब्रुवारी) पुन्हा एकदा भारतीय संघाला धक्का बसला. 19 वर्षांखालील आयसीसी विश्वचषकाचा हा अंतिम सामना होता. ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी भारताला मात दिली आणि आपला चौथा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत एकही पराभव न स्वीकारता अंतिम सामन्यात पोहोचला. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले. असे असेल तरी, शर्वोत्तम प्रदर्शन कऱणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकही ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉपवर नाहीये.
19 वर्षांखालील विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत भारतीय युवा खेळाडू आहे. कर्णधार उदय सहारन याने 397 धावांसह या खास यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. उदयने 7 सामन्यांमध्ये 56.71च्या सरासरीने 397 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकी खेळी केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांचा विचार केला, तर यादीत एकूण तीन भारतीय आणि दोन ऑस्ट्रेलियन फलंदाज आहेत.
उदय सहारनच्या व्यतिरिक्त या यादीत भारताचा मुशीर खान आणि सचिन धस हे आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाच्या हॅरी डिक्सन आणि ह्यूग विबगेन यांनी टॉप पाच मध्ये स्थान मिळवले आहे.
19 वर्षांखालील विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
उदय सहारन – 397
मुशीर खान – 360
हॅरी डिक्सन – 309
ह्यूग विबगेन – 304
सचिन धस – 303
विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांचा विचार केला, तर यजमान दक्षिण आफ्रिका संघाचा क्वेना मफाका 21 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. मफाकाने विश्वचषक हंगामान दोन वेळा 5 विकेट्स हॉल घेतला आहे, तर एकदा 6 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात त्याने चमकदार प्रदर्शन केले. त्याने टाकलेल्या 10 षटकांमध्ये 32 धावा खर्च करून तीन विकेट्स नावावर केल्या. आपल्या अप्रतिम प्रदर्शनासाठी त्याला मालिकावीर पुरस्कार दिला गेला. विश्वचषक हंगामात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या पाच गोलंदाजांच्या यादीत एकमात्र भारतीय गोलंदाज सौम्य पांडे याला संधी मिळाली आहे.
19 वर्षांखालील विश्वचषक 2024 मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणारे खेळाडू
क्वेना मफाका – 21 विकेट्स
सौम्य पांडे – 18 विकेट्स
उबेद शाह 18 विकेट्स
तजीम अली – 14 विकेट्स
कॅलम विडलर – 14 विकेट्स
महत्वाच्या बातम्या –
U19 WC Final : अंडर 19 वर्ल्डकप पराभवानंतर कर्णधार उदय सहारनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आमची तयारी…
‘पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्टेडियम साठी सहकार्य करणार’ – राज ठाकरे