बीसीसीआयने यावर्षी पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएल स्पर्धा आयोजित केली. आयपीएलप्रमाणेच डब्ल्यूपीएलमध्येही मुंबई इंडिन्स संघाने आपले वर्चस्व बनवले आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच हंगामात मुंबई इंडिन्सने विजेतेपद पटकावले. रविवारी (26 मार्च) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हा अंतिम सामना पार पडला. मुंबईने या सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. मेग लेनिंग आपल्या दिल्ली संघाला विजेतेपद पटकावून देऊ शकली नाही, पण तिने हंगामात सर्वाधिक धावा केल्या. चला तर डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंवर एक नजर टाकू.
महिला प्रीमियर लीगची मागरी मागच्या अनेक वर्षांपासून होत आली होती. अखेर यावर्षी बीसीसीआयने ही स्पर्धा आयोजित केला आणि चाहत्यांचा प्रतिसाद देखील अप्रतिम मिळाला. आयपीएलप्रमाणे मुंबई इंडियन्सचा चाहतावर्ग डब्ल्यूपीएलमध्येही जबरदस्त राहिला. अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावल्यानंतर मुंबई इंडियन्सचे नाव डब्ल्यूपीएलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये लिहिले गेले. अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने 19.3 षटकात 3 बाद 134 धावा केल्या आणि विजय मिळवला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघ 9 बाद 131 धावांपर्यंत मजल मारू शकला होता.
दिल्लीची कर्णधार मेग लेनिंग (Meg Lanning) या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसली. लेनिंगने हंगामातील 9 सामन्यांमध्ये लेनिंगने 49.28च्या सरासरीने 345 धावा साकारल्या. 72 ही तिची सर्वोत्तम खेळी राहिली. हंगामात सर्वोत्तम सरासरीने धावा करणाऱ्यांमध्ये मुंबई इंडियन्सची नॅट सायव्हर-ब्रंट (Nat Sciver-Brunt) सर्वोत्तम राहिली. ब्रंटने या हंगामात 66.4 च्या सरासरीने 332 धावा केल्या.
हंगामातील सर्वोत्तम स्ट्राईट रेट दिल्लीच्या शेफाली वर्मा (Shafali Verma) हिचा होता. शेफालीने हंगामातील 9 सामन्यांमध्ये 185.29च्या स्ट्राईक रेटने 252 धावा केल्या आहेत. हंगामातील सर्वोता मोठी खेळी सोफी डिवाईन (Sophie Devine ) हिने केली. सोफीने आरसीबीसाठी खेळताना गुजरात जायंट्सविरुद्ध 99 धावा कुटल्या, पण शतकाला अवघी एक धाव कमी असताना बाद झाली. शेफाली वर्माने हंगामात सर्वाधिक 13 षटकात मारले. तर सर्वाधिक 16 विकेट्स हेली मॅथ्यूजने घेतल्या. तसेच एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन मारिजान केप (Marizane Kapp ) हिने केले. तिने गुजरात जायंट्सविरुद्धच्या एका सामन्यात 4 षटकात 15 धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या होत्या. हंगामातील हे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले.
डब्ल्यूपीएल 2023 मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडू
सर्वाधिक धावा – मेग लेनिंग (345)
सर्वोत्तम सरासरी – नॅट सायव्हर-ब्रंड (66.4)
सर्वोत्तम स्ट्राईक रेट – शेफाली वर्मा (185.29)
सर्वोत्तम खेळी – सोफी डिवाईन 99(36)
सर्वोधिक षटकार – शेफाली वर्मा (13)
सर्वाधिक विकेट्स – हेली मॅथ्यूज(16)
गोलंदाजीत सर्वोत्तम आकडेवारी (एका डावात)- मारिजाने के (5/15)
(Best Performers in WPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त 44 चेंडूत टी20 क्रिकेटमध्ये शतक! क्विंटन डी कॉकसह दक्षिण आफ्रिकी संघ फायद्यात
ब्रेकिंग! बीसीसीआयकडून 2022-23 हंगामासाठी करारबद्ध केलेल्या 26 खेळाडूंची यादी जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळणार 7 कोटी