यावर्षी (२०२१) आयसीसीच्या २ मोठ्या स्पर्धा पार पडल्या. ज्यामध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा (ICC World Test Championship Final) आणि आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेचा समावेश आहे. आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम फेरीत न्यूझीलंड संघाने बाजी मारली, तर टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (ICC T20 world cup) ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कारण यावर्षी ऑस्ट्रेलिया(Australia) संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, भारतीय संघातील खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरले, ज्यामुळे भारतीय(Indian Team) संघाला उपांत्य फेरी देखील गाठता आली नाही. या स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पाकिस्तान (Pakistan)संघाला उपांत्यफेरीत पाकिस्तान संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.
मुख्य बाब म्हणजे ऑस्ट्रेलिया संघ २०२१ मध्ये टॉप ६ संघांमध्ये सर्वात खालच्या स्थानी आहे. तरीदेखील ऑस्ट्रेलिया संघाने जेतेपदावर आपले नाव कोरले.
टी२० मध्ये टॉप – ६ देशांची विजयाची सरासरी (२०२१)
पाकिस्तान : ७७%
दक्षिण आफ्रिका : ६५%
इंग्लंड : ६४%
भारत : ६२.५%
न्यूझीलंड : ५६.५%
ऑस्ट्रेलिया : ४५%*
टॉप ६ देशांमध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या देशांचा समावेश आहे. पाकिस्तान संघाने २०२१ मध्ये एकूण २९ टी२० सामने खेळले. ज्यामध्ये त्यांना २० सामन्यात विजय मिळवण्यात यश आले, तर ६ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच ३ सामने अनिर्णीत राहिले. याचा अर्थ असा की, पाकिस्तान संघाच्या विजयाची सरासरी ७७ टक्के आहे. जी इतर संघांपेक्षा अधिक आहे.
तसेच भारतीय संघाने एकूण १६ टी२० सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी ११ सामन्यात विजय मिळवला. तर ६ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाची विजयाची सरासरी ६४ टक्के आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघाने यावर्षी एकूण २२ टी२० सामने खेळले. ज्यामध्ये त्यांना १० सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. तर १२ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तरीदेखील ऑस्ट्रेलिया संघाने जेतेपदावर आपले नाव कोरले.
महत्वाच्या बातम्या :
केवळ विराट-अश्विन नाही, तर ‘या’ भारतीय खेळाडूंनाही दक्षिण आफ्रिकेत मोठे विक्रम करण्याची सुवर्णसंधी
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण