---Advertisement---

ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या यशाचे गमक आहे ‘सपोर्ट स्टाफ’! स्वतः खेळाडूंनी केला ‘तो’ खुलासा

On: सोमवार, फेब्रुवारी 27, 2023 10:50 PM
Australia Team
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका येथे महिला टी20 विश्वचषक रविवारी (26 फेब्रुवारी) समाप्त झाला. केपटाऊन येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी पराभूत करत विश्वचषक उंचावला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग तिसरा व एकूण सहावा टी20 विश्वचषक आहे. मात्र, या विश्वविजयात संघाइतकेच सपोर्ट स्टाफचे योगदान असल्याचे अनुभवी बेथ मूनी हिने कबूल केले.

केपटाऊन येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना बेथ मूनीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 156 धावा धावफलकावर लावल्या. या धावा पार करताना दक्षिण आफ्रिकेतर्फे लॉरा वॉल्वर्ट हिने अर्धशतक झळकावत एकाकी झुंज दिली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर संघाने दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी पराभूत करत सहाव्यांदा टी20 विश्वचषक आपल्या नावे केला.

बेथ मूनीने या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत 53 चेंडूवर 9 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 74 धावा केल्या. या सामन्यानंतर बोलताना ती म्हणाली,

“दक्षिण आफ्रिकेतील हे दिवस आम्ही खूप मजेत घालवले. इथं खेळण्याची एक वेगळीच भावना होती. अत्यंत उत्कृष्ट प्रेक्षक येथे लाभले. आम्ही विश्वचषकात सहभागी होण्यासाठी आलो तेव्हा सुरुवात फारशी चांगली झाली नाही. माझी स्वतःची कामगिरी देखील चांगली नव्हती. मात्र, सपोर्ट स्टाफने विश्वास दाखवला. त्यांच्यामुळेच आम्ही यश संपादन करण्यात यशस्वी झालो.”

ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत सहा टी20 विश्वचषक जिंकले आहेत. 2010, 2012, 2014, 2018, 2020 व 2023 असे सहा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या नावावर असून, त्यातील चार विश्वचषकात मूनी संघाचा भाग होती. सध्या ऑस्ट्रेलिया संघच वनडे, टी20 व कॉमनवेल्थ अशा तीनही प्रमुख स्पर्धांचा विजेता आहे.

(Beth Mooney Gives His Success Credit To Support Staff)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये फक्त एक भारतीय खेळाडू! मेग लॅनिंगच्या हातून निसटले कर्णधारपद

मितालीसह लग्नाच्या बेडीत अडकला शार्दुल! मराठमोळ्या पद्धतीने पार पडला ‘लॉर्ड’चा विवाहसोहळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---