जन्म आणि मृत्यु, या गोष्टी मनुष्याच्या हातात नसतात. अगदी तंत्रज्ञानामुळे प्रचंड विकसित झालेल्या २१व्या शतकातील मनुष्यही कोणाचा मृत्यु थांबवू शकत नाही. परंतु एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या आठवणी मात्र कायमस्वरुपी जपून ठेवतो. मग त्या तनमनात बसलेल्या आठवणी असो वा फोटो, व्हिडिओच्या रुपात साठवून ठेवलेल्या आठवणी असो.
शुक्रवारी (१८ जून) क्रिडाजगताने एक महान दिग्गज गमावला. फ्लाइंग सिख नावाने विख्यात असलेले भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांनी जवळपास महिनाभर कोविड-१९ महामारीशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भलेही मिल्खा सिंग आज आपल्यात नाहीत. परंतु त्यांचे विक्रम, योगदान आणि त्यांच्या आठवणी सदैव आपल्या मनात राहणार आहेत. अशीच त्यांची एक आठवण म्हणजे, त्यांच्या जिवनावर आधारित (बायोग्राफी) ‘भाग मिल्खा भाग’ हा हिंदी चित्रपट. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित, ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाला सर्वकालिन सर्वोत्कृष्ट क्रिडा बायोग्राफीमध्ये गणले जाते. फहरान अख्तर, सोनम कपूर-अहुजा, दिव्या दत्ता, मिक्षा शफी अशा नामवंत कलाकारांनी या बायोपिकमध्ये काम केले आहे. परंतु या बायोपिकबद्दच्या बऱ्याचशा गोष्टींशी तुम्ही परिचित नसाल.
त्याच कोणालाही माहित नसलेल्या बाबींचा आम्ही येथे आढावा घेतला आहे. चला तर सुरुवात करुया..
१. वर्ष २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या भाग मिल्खा भाग या बायोपिकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने मिल्खा सिंग यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. सोनमच्या या चित्रपटातील पात्राचे नाव बिरो असे होते. या चित्रपटात अभिनय करण्यासाठी तिने केवळ ११ रुपये फी घेतली होती.
२. दिवंगत धावपटू मिल्खा सिंग, ज्यांच्या जिवनावर हा चित्रपट बनला आहे. त्यांनी आपल्या बायोपिकसाठी फक्त एक रुपयाची नोट घेतली होती. यामागचे कारण असे की, ती एक रुपयाची नोट १९५८ मध्ये छापली गेली होती आणि याच वर्षी मिल्खा सिंग यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
३. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा रुपेरी पडद्यावर मिल्खा सिंग यांच्या मुख्य भूमिकेत होता. त्याने मिल्खा सिंग यांच्यासारखे धष्टपुष्ठ शरीर बनवण्यासाठी जवळपास १८ महिने मेहनत घेतली होती.
४. भाग मिल्खा भाग या बायोपिकचे चित्रिकरण करताना मिल्खा सिंग यांनी आपले बूट फरहान अख्तरला दिले होते. ते बूट त्यांनी रोम ऑलिम्पिकवेळी घातले होते.
५. पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका मिशा शफी हिने भाग मिल्खा भाग बायोपिकद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
६. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख ही पदवी दिली होते. मिल्खा सिंग यांनी पाकिस्तानमधील मोठी धावण्याची स्पर्धा जिंकल्यानंतर आयुब यांनी ही पदवी देत त्यांचा सन्मान केला होता.
७. भलेही बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने मिल्खा सिंग यांची प्रेयसी, बिरोची भूमिका साकारली होती. परंतु त्यांच्या जिवनसंगिनी अर्थात निर्मला कौर यांची भूमिका अभिनेत्री श्रीस्वरा हिने केली होती.
८. भाग मिल्खा भाग बायोपिकच्या पुर्वतयारीसाठी जेव्हा मिल्खा सिंग आणि फरहान अख्तर पहिल्यांदा भेटले होते. तेव्हा मिल्खा सिंग यांनी फरहानला त्यांच्यासोबत धावण्याची शर्यत लावण्यास सांगितले होते.
९. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि अष्टपैलू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग या बायोपिकचा भाग होते. ते या बायोपिकमध्ये मिल्खा सिंग यांच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते.
महत्त्वाच्या बातम्या-
साउथम्पटन कसोटीवर पुन्हा काळे ढग आणि अंधुक प्रकाशाचे संकट, तिसऱ्या दिवसाचा खेळ बिघडणार!
पव्हेलियनमध्ये बसून दुर्बिनने रोहित पाहात होता विराटची खेळी; नेटकरी म्हणाले, ‘हीच खरी मैत्री’
रोहितविषयी बोलत असलेल्या समालोचकाला दिनेशने केले ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘मौज कर दी’