जागतिक फुटबॉलची सर्वोच्च प्रशासकीय संस्था फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) तृतीय पक्षाच्या अनावश्यक हस्तक्षेपाचे कारण देत निलंबित केले आहे. फिफाच्या या निर्णयाला माजी कर्णधार बायचुंग भुतिया यांनी अत्यंत कठोर म्हटले आहे. मात्र, फिफाच्या या निर्णयानंतर भारतीय फुटबॉल स्थिरावेल, अशी आशा बायचुंग भुतिया यांनी व्यक्त केली आहे.
भुतिया म्हणाले की, “फिफाने भारतीय फुटबॉलवर बंदी घातली हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि मला वाटते की हा निर्णय अतिशय कठोर आहे. अशावेळी सर्व स्टेक होल्डर फेडरेशन, राज्य संघटनांनी एकत्र येऊन व्यवस्थेत सुधारणा करणे आणि भारतीय फुटबॉलच्या भल्यासाठी काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” त्यामुळे कठीण प्रसंगातही माजी कर्णधाराने भारताला चांगले काम करण्याची प्रेरणा देण्याचं काम केलं आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
टीम इंडियातील कर्णधार बदलीवर काय म्हणाला ‘दादा’, वाचा सविस्तर
ENGvsSA: लॉर्ड्स कसोटीआधीच इंग्लंड संघाचा ‘तो’ फोटो होतोयं भलताच व्हायरल