फर्ग्युसन कॉलेज यांच्या तर्फे आयोजित कुबेर श्रुती डेव्हलपर्स पुरस्कृत व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए -फर्ग्युसन कॉलेज विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या भक्ती ताजने, स्वानिका रॉय, श्रावणी देशमुख, आर्या शिंदे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित भक्ती ताजने हिने आपलीच राज्य सहकारी अदिती रॉयचा 5-7, 6-0, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. गुजरातच्या वृत्तिका मिस्त्रीने मध्यप्रदेशच्या वेदिका श्रीधरचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(5)असा तर, महाराष्ट्राच्या आठव्या मानांकित आर्या शिंदे हिने ध्रुवी आद्ययंथाचा 6-4, 2-6, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. लकी लुझर ठरलेल्या महाराष्ट्राच्या स्वनिका रॉयने निशिता देसाईचे आव्हान 6-4, 6-0 असे संपुष्टात आणले. दुसऱ्या मानांकित क्वालिफायर श्रावणी देशमुख हिने आपली शहर सहकारी काव्या देशमुखला 6-1, 6-0 असे पराभूत केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: मुली:
भक्ती ताजने(महा)(7) वि.वि.अदिती रॉय(महा) 5-7, 6-0, 6-4;
वृत्तिका मिस्त्री(गुजरात) वि.वि.वेदिका श्रीधर(मध्यप्रदेश) 6-1, 7-6(5);
एस प्राची(महा)(5) वि.वि.आस्मी टिळेकर(महा) 7-5, 7-5;
आर्या शिंदे(महा)(8)वि.वि.ध्रुवी आद्ययंथा(महा) 6-4, 2-6, 6-2;
ईशा मोहिते(महा) वि.वि.स्वर्णिमा दुबे (महा) 6-1, 6-2;
स्वनिका रॉय(महा)वि.वि.निशिता देसाई(महा) 6-4, 6-0;
श्रावणी देशमुख(2)(महा)वि.वि.काव्या देशमुख( महा)6-1, 6-0.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
असे आहे बीसीसीआयचे नवे ‘सरकार’! अव्वल राजकारण्यांपासून विविध क्षेत्रातील मान्यवर सामील
भारतीय वंशाच्या कार्तिक मयप्पनने रचला इतिहास, टी20 विश्वचषक 2022ची पहिली हॅट्ट्रीक केली नावावर
मुलाच्या सिलेक्शनची वेळ आली तेव्हा बीसीसीआयचे नवे अध्यक्ष मिटींगमधून गेले होते बाहेर






