भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात,भारतीय संघाने श्रीलंका संघावर ३ गडी राखून विजय मिळवला होता. या विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली होती.तसेच या सामन्यात श्रीलंका संघातील विस्फोटक फलंदाज भानुका राजपक्ष दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर झाला होता. परंतु, तिसऱ्या सामन्यात हा फलंदाज जोरदार पुनरागमन करताना दिसून येणार आहे.
दुसऱ्या वनडे सामन्यात, श्रीलंका संघाचा २९ वर्षीय फलंदाज भानुका राजपक्ष गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर झाला होता. ज्यानंतर त्याला मैदानातून बाहेर जावे लागले होते. या सामन्यात श्रीलंका संघाला ३ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.
तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी,श्रीलंका क्रिकेटने जाहीर केले आहे की, भानुका राजपक्ष हा पूर्णपणे फिट आहे. श्रीलंका क्रिकेटने ट्विट करत म्हटले की,” डाव्या गुडघेदुखीने ग्रस्त असलेला भानुका राजपक्षे आता बरा झाला आहे. तिसर्या वनडे सामन्यात तो निवडीसाठी उपलब्ध असेल.”
Bhanuka Rajapaksa, who suffered a sprain on his left knee, has recovered. He will be available for selection for the 3rd ODI. #SLvIND
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 22, 2021
श्रीलंका संघाने ही मालिका गमावली आहे. परंतु दुसऱ्या वनडे सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. एकवेळी असे वाटले होते की, श्रीलंका संघ हा सामना एकहाती विजय जिंकेल.परंतु शेवटी दीपक चाहरच्या नाबाद ६९ धावा आणि भुवनेश्वर कुमारच्या नाबाद १९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना ३ गडी राखून जिंकला होता. (Bhanuka rajapaksa is available for 3rd odi against India)
राजपक्षची या वनडे मालिकेतील कामगिरी
भानुका राजपक्ष याला भारतीय संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २२ चेंडूत २४ धावांची खेळी केली होती. तो कुलदीप यादवच्या चेंडूवर शिखर धवनच्या हातून झेलबाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात तो ० धावांवर माघारी परतला होता. दुसऱ्या वनडे सामन्यात तो युजवेंद्र चाहलच्या गोलंदाजीवर बाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: बुद्धिबळ खेळायला पैसे नसल्याने क्रिकेटर झालेला भारताचा स्टार खेळाडू ‘युजवेंद्र चहल’
क्रिकेटचे ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकरांबद्दल ‘या’ ५ गोष्टी माहित आहेत का?
गुरुपौर्णिमा विशेष: असे ४ साधारण क्रिकेटपटू, जे पुढे जाऊन बनले महान कोच