---Advertisement---

अवघ्या ९ बॉलमध्ये भानुकाने आणला बवंडर! पाहा झंझावाती खेळीचा व्हिडिओ

On: शुक्रवार, एप्रिल 1, 2022 8:54 PM
bhanuka rajpaksa pbks
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमधील आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये खेळला जात आहे. कोलकाता कर्णधार श्रेयस अय्यर याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पंजाबचा आक्रमक फलंदाज भानुका राजपक्षे याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत तुफान फटकेबाजी केली. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याच्या या छोटेखानी आक्रमक खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

भानुकाची आक्रमक फटकेबाजी

या सामन्यात पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर भानुका राजपक्षे फलंदाजीला उतरला. त्याने अत्यंत धडाक्यात सुरुवात केली. त्याने चौथ्या षटकात कोलकाताचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी याच्यावर जोरदार आक्रमण चढवले. त्याने षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केला. त्यानंतर पुढील तीनही चेंडूवर त्याने उत्तुंग षटकार खेचले. मात्र पाचव्या चेंडूवर मावी त्याला बाद करण्यात यशस्वी ठरला. राजपक्षेने केवळ ९ चेंडूंचा सामना करताना ३१ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ३४४ इतका जबरदस्त राहिला.

https://twitter.com/IPL/status/1509907515697668099?t=IVGghPGNCdgdTwFZ-Jr4tQ&s=19

https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1509899582381379585?t=2QIO2BZ3nSskkqQWGDM-zA&s=19

केकेआरची भेदक गोलंदाजी

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय केकेआरच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. उमेश यादवने सलग तिसऱ्या सामन्यात पहिल्या षटकात बळी मिळवला. त्यानंतर भानुका राजपक्षे व शिखर धवन यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबने पावर प्लेमध्ये ‌‌‌‌‌६०पेक्षा अधिक धावा जमवल्या. लियम लिविंगस्टन व राज बावा जास्त योगदान देऊ शकले नाही. पंजाबने‌‌ १२ षटकात ‌‌‌‌‌९२ धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

राजस्थान संघाने चँपियन शेन वॉर्नची काढली आठवण, पदार्पणवीरांना डेब्यू कॅप देताना केली खास अपील (mahasports.in)

धोनीने नेतृत्व सोडताच पलटले चेन्नईचे नशीब! आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ओढावली ‘अशी’ नामुष्की (mahasports.in)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---