पुणे: विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धेत भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर यांच्यात मुलांच्या गटाची फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे.
वानवडी येथील ‘एस.आर.पी.एफ.’च्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील मुलांच्या गटाच्या फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारती विद्यापीठने कोल्हापूरच्या ‘डी.वाय.पी.सी.ई.टी.’ संघावर २-१ने मात केली. यात आर्यासेन काळेने दहाव्या मिनिटाला गोल करून कोल्हापूरच्या संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, दीपक कश्यप (१२ मि.) आणि स्वराज माने (१७ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून भारती विद्यापीठला विजयी केले. दुसऱ्या उपांत्य लढतीत अंश अग्रवालच्या (३, १५ मि.) दोन गोलच्या जोरावर ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने आकुर्डीच्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर २-०ने मात केली.
मुलींच्या गटाची फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि पिंपरी-चिंचवडचा एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघ यांच्यात रंगणार आहे. पहिल्या उपांत्य लढतीत नानावटी कॉलेजने आकुर्डीच्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली. यात सेजल सारडाने (११ मि.) केलेला गोल निर्णायक ठरला. दुसऱ्या उपांत्य लढतीत सानिका पाटणेने (३ मि.) केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर पाटील कॉलेजने सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली.
उपांत्य फेरीचे निकाल :
व्हॉलिबॉल मुले – १. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-१४, २५-२२.
२. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड २५-२२, २५-१७.
व्हॉलिबॉल मुली – १. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-१५, १५-१९.
२. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर वि. वि. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-२३, २५-२४.
बास्केटबॉल मुले –
१. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ४६ वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३३.
२. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर – २३ वि. वि. अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १८.
बास्केटबॉल मुली –
१. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३२ वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी चिंचवड – १०.
२. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – २६ वि. वि. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ९.