पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत पुरुष गटात अरमान भाटिया याने तर, महिला गटात साई संहिता चमर्थी या खेळाडूंनी दुहेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत महिला गटात कर्नाटकच्या दुसऱ्या मानांकित प्रतिभा नारायण हिने आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या नेहा घारेचा 6-3, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरीत प्रतिभा नारायणाचा सामना अव्वल मानांकित तामिळनाडूच्या साई संहिता चमर्थीशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित तामिळनाडूच्या साई संहिता चमर्थी हिने आपली विजयी मालिका कायम तिसऱ्या मानांकित तेलंगणाच्या श्राव्या चिलकलापुड्डीचा 6-1, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत अंतिम फेरीत तेलंगणाच्या श्राव्या चिलकलापुड्डीने तामिळनाडूच्या साई संहिता चमर्थीच्या साथीत महाराष्ट्राच्या ईश्वरी मातेरे व नेहा घारे यांचा 6-1,6-2असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.
पुरुष गटात उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित दिल्लीच्या अनुराग नेनवानीने पश्चिम बंगालच्या अव्वल मानांकित ईशाक इकबालचा 7-5, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या अरमान भाटियाने कर्नाटकाच्या निक्षेप रवीकुमारचा 6-4, 6-0असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
दुहेरीत महाराष्ट्राच्या अरमान भाटियाने पश्चिम बंगालच्या ईशाक इकबालच्या साथीत ऍलेक्स सोलंकी व निक्षेप रवीकुमार यांचा 5-0असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
या सामन्यात 5-0अशा फरकाने भाटिया व इकबाल हि जोडी आघाडीवर असताना निक्षेप रवीकुमारला दुखापत झाल्यामुळे या जोडीने माघार घेतली. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक जावेद सुनेसरा व एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: पुरुष गट:
अनुराग नेनवानी(दिल्ली)(4)वि.वि.ईशाक इकबाल(पश्चिम बंगाल)(1)7-5, 6-1
अरमान भाटिया(महा)(8)वि.वि.निक्षेप रवीकुमार(कर्नाटक) 6-4, 6-0
महिला गट:
साई संहिता चमर्थी(तामिळनाडू)(1)वि.वि.श्राव्या चिलकलापुड्डी(तेलंगणा)(3)6-1, 6-3
प्रतिभा नारायण(कर्नाटक)(2)वि.वि.नेहा घारे(महा)(8)6-3, 6-1
दुहेरी गट: पुरुष: अंतिम फेरी:
ईशाक इकबाल(पश्चिम बंगाल)/अरमान भाटिया(महा) वि.वि.ऍलेक्स सोलंकी/निक्षेप रवीकुमार 5-0सामना सोडून दिला;
महिला गट:
श्राव्या चिलकलापुड्डी(तेलंगणा)/साई संहिता चमर्थी(तामिळनाडू) वि.वि.ईश्वरी मातेरे(महा)/नेहा घारे(महा)6-1,6-2
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनीने रणजी ट्रॉफी खेळणे म्हणजे युवा खेळाडूची संधी हुकणे!
–भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक