पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महिला गटात साई संहिता चमर्थी हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, पुरुष गटात दिल्लीच्या अनुराग नेनवानी याने विजेतेपद पटकावले आहे.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत महिला गटात अव्वल मानांकित तामिळनाडूच्या साई संहिता चमर्थी हिने कर्नाटकच्या दुसऱ्या मानांकित प्रतिभा नारायण 6-0, 6-3 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. साई ही एमओपी वैष्णा येथे वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला शिकत असून चेन्नई टेनिस सेंटर येथे प्रशिक्षक सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे. महिला गटातील विजेत्या खेळाडूला करंडक व 16एआयटीए गुण प्रदान करण्यात आले.
पुरुष गटात अंतिम फेरीत चौथ्या मानांकित दिल्लीच्या अनुराग नेनवानीने आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या अरमान भाटियाचा टायब्रेकमध्ये 7-6(0), 6-1असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 10मिनिटे चालला. अनुराग हा एसजीटीबी खालसा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला शिकत असून आदर पुनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक आदित्य मडकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. पुरुष गटांतील विजेत्या खेळाडूला करंडक व 35एआयटीए गुण प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण इवो वेल्तुजीस, स्पर्धा संचालक जावेद सुनेसरा व एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: पुरुष गट:
अनुराग नेनवानी(दिल्ली)(4)वि.वि.अरमान भाटिया(महा)(8)7-6(0), 6-1;
महिला गट:
साई संहिता चमर्थी(तामिळनाडू)(1)वि.वि.प्रतिभा नारायण(कर्नाटक)(2)6-0, 6-3
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनीने रणजी ट्रॉफी खेळणे म्हणजे युवा खेळाडूची संधी हुकणे!
–भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक