भारतीय महिला पॅरा ऍथलीट भाविनाबेन पटेलने राष्ट्रीय खेळ दिवसाच्या शुभ मुहूर्तावर (रविवारी) देशाला टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून दिले आहे. पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये खेळायला उतरलेली ३४ वर्षीय भाविनाने तिच्या प्रदर्शनाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. तिला टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जगातली क्रमांक एकची खेळाडू चीनची झाउ यिंगच्या विरुद्ध ०-३ अशा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भाविना दोन वेळा सुवर्णपदक विजेती झाउ विरोधात १९ मिनिटात ७-११, ५-११, ६-११ अशी पराभूत झाली. असे असले तरी ती भारताला सध्याच्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील देशाला पहिले पदक मिळवून देणारी खेळाडू ठरली आहे. भारतीय पॅरालिम्पिक समितीची सध्याची अध्यक्षा दीपा मलिक पाच पर्षापूर्वी रियो पॅरालिम्पिक स्पर्धेत गोळा फेकमध्ये देशाला रौप्यपदक मिळवून देणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती.
व्हिलचेअरवर बसून खेळणारी भाविनाबेनला या आठवड्याच्या सुरुवातीला तिच्या पहिल्या ग्रुप सामन्यातही झाउ विरोधार पराजयाचा सामना करावा लागला होता. भाविनाने पदक जिंकल्यानंतर सांगितले, “मी हे पदक त्या लोकांनी समर्पित करू इच्छिते, ज्यांनी माझे समर्थन केले, पीसीआय, साई, टाॅप्स, ब्लाइंड पीपल एसोसिएशन आणि माझा सर्व मित्रपरिवार. हे पदक माझ्या प्रशिक्षणांनाही समर्पित आहे, ज्यांनी नेहमी माझे समर्थन केले आणि मला कडक ट्रेनिंग दिली, ज्यामुळे मी या जागेवर पोहचू शकले. माझे फिजिओ, डायटीशियन आणि खेळ मनोवैज्ञानिक यांचेही विशेष धन्यवाद.”
बीजिंग आणि लंडनमध्ये सुपर्णपदकासह पॅरालिम्पिक स्पर्धेत पाच पदक जिंकणारी झाउच्या विरोधात भाविना झुज देताना दिसली आणि सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना दिसली. विश्व चॅम्पियनशिपची साहावेळची पदकविजेती झाउने जागातल्या १२ व्या क्रमांकाची खेळाडू भाविनाबेनला सामन्यात कसलीच संधी दिली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ऍशेस’ मालिकेचा आणि २९ ऑगस्टचा आहे खास संबंध; वाचा सविस्तर
पुजारा, रहाणेनंतर आता रिषभ पंत चाहत्यांच्या रडारवर; ‘या’ खेळाडूला खेळवण्याची होतेय मागणी
आतुरता आयपीएलची! रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनेही धरली युएईची वाट; फोटो व्हायरल