भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे.या मालिकेतील दुसरा टी-२० सामना बुधवारी (२८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह ही मालिका आता १-१ ने बरोबरीत आली आहे. परंतु या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले होते. तर आपला पहिलाच टी-२० सामना खेळत असलेल्या देवदत्त पडिक्कलने २९ धावांचे योगदान दिले होते. तसेच सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाडने २१ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या सामन्यात भारतीय संघाला २० षटकअखेर ५ बाद १३२ धावा करण्यात यश आले होते. (Bhuvneshwar Kumar becomes the 4th highest wicket taker in T20I for india)
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाकडून धनंजय डी सिल्वाने अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी केली. तसेच मिनोद भानुकाने ३६ धावांचे योगदान देत हा सामना श्रीलंका संघाला ४ गडी राखून जिंकून दिला. यासह ही मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.
भुवीचा कारनामा
भारतीय संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार हा या सामन्यात चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. त्याच्या गोलंदाजीवर श्रीलंकन फलंदाजांना मोठे फटके खेळता येत नव्हते. त्याने सलामी फलंदाज अविष्का फर्नांडोला ११ धावांवर माघारी धाडले. हा गडी बाद करताच त्याच्या नावावर मोठ्या करनाम्याची नोंद झाली आहे. टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत एकूण ५० गडी बाद केले आहेत. या यादीत अव्वलस्थानी युजवेंद्र चहल आहे. त्याने आतापर्यंत ६३ गडी बाद केले आहेत. त्यानंतर जसप्रीत बुमराहने ५९ आणि आर अश्विनने ५२ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज
युजवेंद्र चहल : ६३
जसप्रीत बुमराह : ५९
आर अश्विन : ५२
भुवनेश्वर कुमार : ५०
महत्त्वाच्या बातम्या-
याला म्हणायचे चपळाई! राहुल चाहरने सीमारेषेजवळ घेतलेल्या ‘त्या’ अफलातून झेलाचा व्हिडिओ व्हायरल
पहिल्याच सामन्यात पडिक्कलच्या नावे जमा झाला कधीही न मोडणारा विक्रम, वाचा सविस्तर
तुझी माझी जोडी जमली गं! अथियाच्या सेल्फीमध्ये राहुलची खास पोज, इंग्लंडमध्ये दिसले एकत्र