संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या एशिया कप 2018 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताने साखळी फेरीत 18 सप्टेंबरला हाँग काँगला तर 19 सप्टेंबरला पाकिस्तानचा पराभव केला आहे आणि सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे.
भारताला हाँग काँग विरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. मात्र भारताने पाकिस्तान विरुद्ध एकतर्फी सहज विजय मिळवला.
पाकिस्तान विरुद्धच्या या विजयानंतर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने तलवारीने केक कापून सेलिब्रेशन केले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलात व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/Bn7ysflgVME/?taken-by=ms_dhoni_fan_club.0__7
भूवनेश्वरने पाकिस्तान विरुद्ध 15 चेंडूत 3 विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. त्याने सामन्याच्या पहिल्या पाच षटकांच्या आतच पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज फकार जामन आणि इमाम उल हकला बाद केले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला त्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.
या सामन्यात भूवनेश्वर बरोबरच केदार जाधवनेही 23 चेंडूत 3 विकेट्स घेतल्या होत्या. भारताने पाकिस्तानला 162 धावांवर रोखले होते. त्यानंतर 2 विकेटच्या मोबदल्यात भारताने 163 धावांचे आव्हान सहज पार केले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल एक वर्षानंतर दिग्गज अष्टपैलू खेळाडूचे टीम इंडियात पुनरागमन
–धोनीसाठी आजचा दिवस खास, बांगलादेशविरुद्ध होऊ शकतो विक्रमांचा विक्रम
–या कारणामुळे सुनील गावस्करांनी फकार जामन आणि दिनेश कार्तिकला सुनावले खडेबोल