इंग्लंडविरुद्धचा सलग दुसरा टी-२० सामना भारताने जिकंला आणि टी-२० मालिकाही नावावर केली. मालिकेतील पहिला सामना ६ जुलै रोजी भारताने ५० धावांनी जिकला होता. त्यानंतर शनिवारी (९ जुलै) उभय संघातील दुसरा टी-२० सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या सामन्यातील अप्रतिम प्रदर्शनासाठी भुवनेश्वर कुमारला सामनावीर निवडले गेले. भुवनेश्वरने हा पुरस्कार जिंकून एका खास विक्रमाची नोंदही केली.
भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) याने या सामन्यात तीन षटके गोलंदाजी केली आणि अवघ्या १५ धावा खर्च करून ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा संघ १७ धावांमध्ये १२१ धावा खर्च करून सर्वबाद झाला आणि भुवनेश्वरला शेवटचे षटक टाकण्याची वेळ आलीच नाही. सलमीवीर जेसन रॉय (०) आणि जोस बटलर (४) यांना भुवनेश्वरने स्वस्तात बाद केले आणि इंग्लंड संघाला अडचणीत टाकले. तसेच पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसनलाही अवघ्या दोन धावांवर तंबूत पाठवले.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भुवनेश्वरला त्याच्या अप्रतिम फलंदाजीसाठी सामनावीर निवडले गेले. ही चौथी वेळ आहे, जेव्हा भुवनेश्वर कुमार एखाद्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सामनावीर ठरला आहे. भुवनेश्वर आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक वेळा सामनावीर बनलेला वेगावन गोलंदाज बनला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक वेळा सामनावीर ठरेल्या वेगवान गोलंदाजाचा विचार केला, तर दिग्गज कपिल देवच्या (८ वेळा) नावावर हा विक्रम आहे. तर एकदिवसीय क्रिकेमध्येही ही कामगिरी कपिल देवच्याच (११ वेळा) नावावर आहे.
सर्वाधिक वेळा सामनावीर ठरलेला भारताचे वेगवान गोलंदाज
कसोटी क्रिकेट – कपिल देव (८ वेळा)
एकदिवसीय क्रिकेट – कपिल देव (११ वेळा)
टी-२० क्रिकेट – भुवनेश्वर कुमार (४ वेळा)
दरम्यान, उभय संघातील या दुसऱ्या टी-२० सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा केल्या. प्रत्युत्तार इंग्लंडचा संघ १२१ धावांवर सर्वबाद झाला. टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (१० जुलै) खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघातील जागा गमावलेला ‘हा’ यष्टीरक्षक आता मेंटॉर म्हणून सुरू करतोय नवी इनिंग
‘रोहितसेने’चा विजयरथ सुस्साट..! दुसऱ्या टी२०तील मोठ्या विजयासह भारताने मालिकाही घातली खिशात
धडक देऊ का याला! पंत आणि रोहित यांच्यातील धक्कादायक संभाषण व्हायरल