यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात लिजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन केले जाणार असल्याचे समोर आले आहे. या हंगामात अनेक खेळाडूंना खेळण्यासाठी परवानगी दिली गेली आहे. अशात काही नवीन नावेही या यादीत सामील झाली आहेत. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतही या लीगमध्ये खेळणार असल्याचे समोर आले आहे.
एस श्रीसंत (S Sreesanth) तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकही या हंगामाता लिडेंड्स लीग क्रिकेटमध्ये सहभाग घेणार आहे. श्रीसंत भारताच्या दोन विश्वचषक विजेता संघाचा भाग राहिला आहे. त्याने संघासोबत २००७ साली टी-२० विश्वचषक, तसेच २०११ साली एकदिवसीय विश्वचषक जिंकाला होता. आता मोठ्या काळानंतर श्रीसंत मैदानात पुनरागमन करणार असून जुण्या सहकाऱ्यांसोबत खेळताना दिसणार आहे.
लिजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामात सहभाग घेण्यासाठी श्रीसंत उत्सुक आहे. मैदानात पुनरागमन करण्याविषयी तो म्हणाला की, मी मैदानात पुनरागमन करण्यासाठी, लिजेंड्समध्ये सहभागी होण्यासाठी आणि एलएलसीच्या दुसऱ्या हंगामात खेळण्यासाठी उत्साहित आहे.
आयर्लंडचा माजी खेळाडू केविन ओब्रायनही या लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. ओब्रायन याविषयी बोलताना म्हणाला की, वर्ल्ड जायंट्स संघासोबत खेळताना आमच्यासाठी मागचा हंगाम चांगला होता. आता नवीन हंगामात मी फ्रँचायझीचा भाग बनण्यासाठी आणि दुसऱ्या हंगामात खेळण्यासाठी उत्सुक आहे.