भारताचे जवळजवळ सर्व क्रिकेटपटू सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात. पण भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार ट्विटर, इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असला तरी फेसबूकपासून दूर आहे. यामागे कारणही तसेच आहे. त्याची पत्नी नुपुर हीने एकदा त्याचे फेसबूक अकाऊंटच हॅक केले. त्यामुळे त्याने फेसबूक वापरणे सोडून दिले.
याबद्दल क्रिकबझच्या स्पायसी पिच या शोमध्ये बोलताना भुवनेश्वरने खूलासा केला आहे. तो म्हणाला, ‘नुपुरने एकदा माझ्या फेसबुकचा पासवर्ड मागितला. पण मी तो देणे टाळले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने मला सांगितले की हा आता तुझा नवीन पासवर्ड आहे. तिने खरंच माझं अकाऊंट हॅक केले होते आणि त्यानंतर मी फेसबूक वापरले नाही.’
नुपुर आणि भुवनेश्वर पहिल्यांदा भेटले तेव्हा भुवनेश्वर १३ वर्षांचा होता. त्यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये विवाह केला आहे. भुवनेश्वरची पदार्पणाच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध केलेली कामगिरी सर्वात आवडती असल्याचेही या शोमध्ये नुपुरने सांगितले आहे. त्याने डिसेंबर २०१२ला आतंरराष्ट्रीय पदार्पण करताना पाकिस्तान विरुद्धच्या टी२० सामन्यात ९ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या.
सध्या भुवनेश्वर मागील काही महिन्यांपासून दुखापतीमुळे भारतीय संघातून दूर होता. त्याच्यावर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. पण आता तो या दुखापतीतून सावरला आहे. तसेच लवकरच भारतीय संघातून पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
ट्रेंडींग घडामोडी –
-आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू
-मुंबई आणि क्रिकेट: मुंबई क्रिकेटचा दैदिप्यमान इतिहास
-टीम इंडियामधून बाहेर झालेला धोनी बीसीसीआयच्या पोस्टरवरुनही गायब, चाहतेही झाले हैराण
-पंतप्रधान मोदींना का आली युवराज-कैफच्या नेटवेस्ट सिरीजमधील खेळीची आठवण