मागील काही दिवसांत भारतीय क्रिकेट संघाच्या बऱ्याचशा शिलेदारांनी त्यांच्या कुटुंबीयांना गमावले आहे. काहींचे जवळचे व्यक्ती जागतिक महामारी कोरोनाचे शिकार बनले आहेत. तर काहींचे वृद्धापकाळाने किंवा इतर कोणत्या आजारामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपुर्वीच भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचे वडिल किरनपाल सिंग यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. यानंतर आता त्याची इंद्रेश यांची तब्येतही नाजूक असल्याचे समजत आहे.
भुवनेश्वरचे वडील २० मे रोजी जग सोडून गेल्यानंतर त्यांचे मूळ गाव लुहारी येथे त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले होते. त्यामुळे भुवनेश्वर, त्याची आई इंद्रेश, पत्नी नूपुर आणि बहीण रेखा हे लुहारीमध्येच थांबले आहेत.
तिथेच इंद्रेश यांची तब्येत बिघडली आहे. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आहे. यामुळे काही दिवस त्यांना गावामध्येच ऑक्सीजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. परंतु त्यांच्या तब्येतीत सुधार न झाल्याने शनिवारी (३० मे) सकाळी त्यांना मेरठच्या एका रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यावेळी डॉक्टरांनी त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आज भुवनेश्वरच्या दिवंगत वडिलांची तेरावी आहे.
कोरोनाची बाधा झाली असल्याची चर्चा
इंद्रेश यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची चर्चा गावभर आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, कोरोनामुळेच त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. असे असले तरीही, अद्याप त्यांना कोरोना झाला आहे की नाही, याबाबत कसलीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. परंतु वडिलांनंतर आईची तब्येत बिघडल्याने भुवनेश्वरची चिंता नक्कीच वाढली असावी.
श्रीलंका दौऱ्यावर करू शकतो भारताचे नेतृत्त्व
भारतीय क्रिकेट संघाला जून महिन्यात इंग्लंड दौरा करायचा आहे. परंतु भुवनेश्वरची या दौऱ्यावर निवड करण्यात आली नाही. मात्र जुलै महिन्यात भारतीय संघाची अजून एक तुकडी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारताला श्रीलंकाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भुवनेश्वरला भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. याबरोबरच तो भारतीय संघाचा कर्णधार होण्याचा प्रबळ दावेदार असल्याचेही सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या भारतीय संघाचा ‘हा’ शिलेदार खेळणार परदेशी लीग, ठरला पहिलाच खेळाडू
आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची न्यूझीलंडविरुद्ध चिंताजनक आकडेवारी, WTC फायनलमध्ये अवघड होणार!
दिल्ली कॅपिटल्सला गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचवणाऱ्या रिषभचे नेतृत्त्वपद धोक्यात!