महिला क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू व कर्णधार मिताली राज आज(3 डिसेंबर) तिचा 37 वा वाढदिवस साजरा करीत आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॉलिवूडमधून एक मोठी घोषणा समोर आली आहे.
मितालीच्या जीवनावर ‘शाब्बास मिथू’ हा चरित्रपट बनणार आहे. या चरित्रपटात ‘सांड की आँख’मध्ये वयोवृद्ध नेमबाजची भूमिका साकारली अभिनेत्री तापसी पन्नू मितालीची भूमिका साकारणार आहे.
या बातमीची खूद्द तापसीनेच पुष्टी केली आहे. तीने सोशल मीडियावर मितालीबरोबर केक कापतानाचा फोटो शेअर करताना चाहत्यांना ही ती मितालीची भूमिका निभावणार असल्याची खूशखबरी दिली आहे.
Happy Birthday Captain @M_Raj03 On this Birthday, I don’t know what gift I can give you but this promise that I shall give it all I have to make sure you will be proud of what you see of yourself on screen with #ShabaashMithu
P.S- I’m all prepared to learn THE ‘cover drive’ pic.twitter.com/a8Ha6BMoFs— taapsee pannu (@taapsee) December 3, 2019
तसेच हे फोटो शेअर करताना तापसीने लिहिले आहे की ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅप्टन. तू आम्हा सर्वांना अनेक प्रकारे अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे आणि तुझा प्रवास पडद्यावर साकारण्यासाठी मला निवडले जावे ही खरोखर माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.’
‘या वाढदिवशी मला माहित नाही की मी तुला काय भेट देऊ, पण हे वचन देते की मी ते सर्व काही करेल की तू जेव्हा तूला शब्बास मिथूमध्ये स्क्रीनवर पाहशील तेव्हा तूला अभिमान वाटेल.’
https://www.instagram.com/p/B5mEVCRJF3W/
3 डिसेंबर 1982 रोजी जन्मलेली मिताली भारतीय महिला वनडे क्रिकेट संघाची कर्णधार आहे. तसेच ती महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
जोधपूरमध्ये जन्मलेल्या मितालीने जून 1999 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन दशकांहून अधिक काळ व्यतीत करूनही ती अजूनही सक्रिय आहे.
तिने आत्तापर्यंत 209 वनडे सामन्यांमध्ये 6888 धावा केल्या आहेत. तसेच तिने 10 कसोटी सामन्यांत 663 धावा केल्या आहेत आणि 89 टी20 सामन्यांत तिने 2364 धावा केल्या आहेत.
…म्हणून बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकणाऱ्या मेस्सीच्या मुलाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
वाचा????https://t.co/DqnHLrSdbb????#म #मराठी #Football @Mazi_Marathi @BeyondMarathi #BallonDor2019 #LionelMessi— Maha Sports (@Maha_Sports) December 3, 2019
वाढदिवस विशेष: क्रिकेटमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक मार्क बाउचरबद्दल काही खास गोष्टी…
वाचा????https://t.co/6zdSVjzXpN????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #HappyBirthday #MarkBoucher— Maha Sports (@Maha_Sports) December 3, 2019






