ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग टी20 (BBL T20) स्पर्धा सुरू आहे. यामध्ये दररोज काहीतरी नवीन पाहायला मिळते. अशाच प्रकार या सामन्यात मंगळवारी (21 जानेवारी) एक अनोखी गोष्ट पहायला मिळाली.
मंगळवारी डॉकलँड (Dockland) येथे हॉबर्ट हरिकेन्स विरुद्ध मेलबर्न रेनगेड्स (Melbourne Renegades vs Hobart Hurricanes) संघात बिग बॅश लीगमधील सामना पार पडला. या सामन्यात मेलबर्न रेनगेड्स फलंदाज सॅम हार्पर (Sam Harper) बाद होण्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात हॉबर्ट हरिकेन्सचा गोलंदाज नॅथन एलिसला धडकून हवेत उडाला नंतर मैदानावर कोसळला.
😨 Nasty collision in the middle between Sam Harper and Nathan Ellis. Play has stopped while the docs take a look at Harper #BBL09 pic.twitter.com/yDARqnMtRl
— KFC Big Bash League (@BBL) January 21, 2020
मेलबर्न रेनगेड्सकडून खेळताना सॅम या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. मात्र तो एलिसला धडकून पडल्यामुळे दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून बाहेर जावे लागले. यावेळी त्याने फक्त 6 धावा केल्या होत्या.
झाले असे की एलिसने टाकलेल्या चौथ्या षटकातील एका चेंडूवर सॅमने जोरदार फटकार मारला आणि 1 धाव घेण्यासाठी पळाला. परंतु या दरम्यान क्षेत्ररक्षकाने चेंडू रोखला आणि नॉन स्ट्राईकर एंडवर असणाऱ्या गोलंदाजाकडे फेकला.
तेव्हा सॅमचे लक्ष गोलंदाजाऐवजी चेंडू आडवणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडे होते. त्यावेळी तो बाद होण्यापासून वाचण्यासाठी नॉन स्ट्रायकर एन्डच्या दिशेने पळत होता. परंतु समोर एलिस असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळे तो त्याला धडकला आणि हवेत उडून खाली पडला.
याबद्दलची माहिती बीबीएलने ट्विटरवरून देत सांगितले की यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
The latest on Sam Harper: The club's medical staff have confirmed Harper sustained concussion in the incident earlier this innings. He has been taken to hospital as a precaution for further observation #GETONRED
— Melbourne Renegades (@RenegadesBBL) January 21, 2020
सॅम जखमी झाल्यामुळे त्याचा बदली खेळाडू म्हणून टॉम कूपरला (Tom Cooper) संधी देण्यात आले आहे.
या सामन्यात हॉबर्ट हरिकेन्सने 4 धावांनी विजय मिळवला.
बीसीसीआयने करारबद्ध न केलेल्या धोनीला या ७ गोष्टीतून मिळणार तब्बल १३६ कोटी
वाचा👉https://t.co/tChPzC2qm1👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @msdhoni— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
रोहित षटकारांच्या तालावर जगातील गोलंदाजांना नाचवतो परंतु न्यूझीलंडमध्ये मात्र…
वाचा- 👉https://t.co/BQRstfGqno👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020