---Advertisement---

चेंडू लपवा आणि पळा! बिग बॅश लीग सामन्यादरम्यान घडली मजेशीर घटना, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, डिसेंबर 12, 2020 5:43 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथील मैदानावर शनिवारी (१२ डिसेंबर) मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर संघात बिग बॅश लीगचा सामना झाला. या सामन्यात मेलबर्न स्टार्स संघाने २२ धावांनी विजय मिळवला. सामन्यादरम्यान मेलबर्न स्टार्स संघाचा फलंदाज निक लार्किन याच्याकडून नकळत अत्यंत मजेशीर गोष्ट घडली. बिग बॅश लीगने लार्किनचा तो गमतीशीर व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

नक्की काय केले निक लार्किनने ?
झाले असे की, लार्किन (ऑस्ट्रेलियन फलंदाज) सामन्याच्या अंतिम षटकात संघाचा डाव पुढे नेत होता. दरम्यान एका चेंडूला हिट करताना त्याने गुडघ्यावर बसून हवेत बॅट फिरवली. मात्र नक्की आपल्या बॅटचा चेंडूला स्पर्श झाला आहे का नाही? तसेच चेंडू कुठे गेला आहे?, हे त्याला समजले नाही. तरी तो विरुद्ध संघाच्या खेळाडूंनी चेंडू पकडेपर्यंत एक धाव घेण्याच्या उद्देशाने धावला.
परंतु, चेंडू लार्किनच्या शर्टमध्ये अडकून बसला होता. अशात लार्किन धाव घेण्यासाठी पळाल्यानंतर हालचालीमुळे तो चेंडू खाली पडला. हे पाहून विरुद्ध संघाच्या खेळाडूंसह लार्किन स्वत:देखील हसू लागला. एवढेच नव्हे तर, समालोचकांनाही ही गमतीशीर घटना पाहून हसू आवरले नाही.
बिग बॅश लीगने लार्किनच्या याच गमतीशीर घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. सोबतच या व्हिडिओला चेंडू लपवा आणि पळा!, असे भन्नाट कॅप्शन दिले आहे. त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

सामन्याची आकडेवारी
मेलबर्न स्टार्स विरुद्ध सिडनी थंडर संघातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मेलबर्न स्टार्स संघाने ८ बाद १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनी थंडर संघ मर्यादित २० षटकात केवळ १४७ धावाच करु शकला. त्यामुळे मेलबर्न स्टार्सने २२ धावांनी सामना खिशात घातला.
यात मेलबर्न स्टार्स संघाच्या मार्कस स्टॉइनिसच्या तूफानी अर्धशतकी खेळीचा मोलाचा वाटा राहिला. स्टॉयनिसने सलामीला फलंदाजीला येत  केवळ ३७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार लगावत ६९ धावा केल्या. तसेच कर्णधार ग्लेन मॅक्सवेलनेही ३९ धावांचे योगदान दिले. निक लार्किन या सामन्यात केवळ १५ धावा करु शकला.
तर सिडनी थंडर संघाकडून कर्णधार कॅलम फर्ग्युसनने अर्धशतक लगावले. तसेच ऍलेक्स हेल्सनेही ४६ धावा केल्या. परंतु, उर्वरित फलंदाजांना २ आकडी धावाही करता आल्या नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या-

NZvsWI 2nd Test: न्यूझीलंडच्या अष्टपैलू प्रदर्शनाने वेस्ट इंडिज संकटात, दुसऱ्या दिवसाखेर ३३६ धावांनी पिछाडीवर

Ind vs Aus A: शुभमन गिलचे दमदार अर्धशतक, दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघ सुस्थितीत

विश्वचषक जिंकून देण्यात युवराजची भूमिका सर्वात महत्त्वाची; पाहा आकडे काय सांगतात?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---