---Advertisement---

मुंबई वि. पंजाब: तीन महिन्यांपूर्वीच्या ‘त्या’ अपमानाचा दिपक हुडा घेणार बदला? ‘कृणाल पंड्या’ असणार निशाण्यावर

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 5:37 PM
Deepak-Hooda-and-Krunal Pandya
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये आजचा (२३ एप्रिल) सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. परंतु संघांपेक्षा या सामन्यात तीन महिन्यांपूर्वी वाद झालेल्या दोन खेळाडूंवर चाहत्यांचे लक्ष असेल. आज हे दोन्ही खेळाडू आमनेसामने असतील. हे दोन खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्सचा कृणाल पंड्या आणि पंजाब किंग्सचा दीपक हुडा. या दोघांमुळे सामन्यात नक्कीच चाहत्यांना रंगत पाहायला मिळेल.

दोघांमध्ये झाला होता वाद
आयपीएल २०२१ मधील सतरावा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्या दरम्यान होणार आहे. मात्र, या सामन्यात सर्वांच्या नजरा मुंबईचा अष्टपैलू कृणाल पंड्या आणि पंजाबचा दीपक हुडा यांच्याकडे असतील. आयपीएल २०२१ मध्ये हे दोन्ही खेळाडू आपापल्या संघांचा महत्त्वाचा भाग आहेत. कृणाल गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही गोष्टींनी चमत्कार करु शकतो तर, दीपक हूडा आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे फिरवू शकतो.

बातम्यांनुसार, या दोन खेळाडूंमध्ये तीन महिन्यांपूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या सराव शिबिरादरम्यान वाद झाला होता. हुडाने कृणालवर आपल्याला सर्व संघ सहकाऱ्यांसमोर अपमानित करण्याचा आणि कारकीर्द संपुष्टात आणण्याची धमकी दिली असा आरोप लावला होता. त्यानंतर बडोदा क्रिकेट संघटनेने चौकशीअंती हुडाला संपूर्ण देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामातून निलंबित केले होते. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू आजच्या सामन्यासाठी अधिक ऊर्जेने मैदानात उतरतील.

हुडाची दमदार कामगिरी
सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामात दीपक हूडा तुफान फॉर्ममध्ये आहे. हंगामातील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्याने ६४ धावांची विस्फोटक खेळी केली होती. त्यानंतर देखील त्याने चांगली फलंदाजी केली आहे. दुसरीकडे कृणाल चार सामन्यात केवळ २६ धावा करु शकला आहे. तर, ३ बळी देखील घेण्यात तो यशस्वी ठरला.

महत्त्वाच्या बातम्या –

आकाशी ड्रेस अन् चेहऱ्यावर गोड स्माईल; मिसेस बुमराहच्या फोटोवर जस्सी घायाळ, दिली ‘अशी’ रिऍक्शन

बाबो! पाकिस्तानी गोलंदाजाने इतका खतरनाक बाऊंसर टाकला की फलंदाजाच्या हेल्मेटचे झाले दोन तुकडे, पाहा व्हिडिओ

वडिलांच्या निधनांतरही खेळली होती आयपीएल, मुंबईविरुद्ध ‘या’ धाकड फलंदाजाला आजमावणार पंजाब?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---