इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता फक्त काहीच दिवस उरले आहेत. 31 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, यापूर्वीच पंजाब किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन याला आयपीएल 2023 स्पर्धेतील पंजाब किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळता येणार नाहीये. यामुळे पंजाब संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने डिसेंबरमध्ये झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर अजूनपर्यंत लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) याला फिटनेस प्रमाणपत्र दिले नाहीये. पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Punjab Kings vs Kolkata Knight Riders) संघात 1 एप्रिल रोजी स्पर्धेचा दुसरा सामना खेळला जाणार आहे. याच सामन्यापासून पंजाबचे स्पर्धेतील अभियान सुरू होणार आहे.
Liam Livingstone set to miss the opening match for Punjab Kings. (Reported by PTI).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 29, 2023
खरं तर, डिसेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण करताना लिव्हिंगस्टोन दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळले नाहीये. 29 वर्षीय लिव्हिंगस्टोनला मागील वर्षी मायदेशातील ‘द हंड्रेड’ स्पर्धेत खेळतानाही घोट्याला दुखापत झाली होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, लिव्हिंगस्टोन हा पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. कारण, ईसीबीकडून त्याच्या फिटनेसची स्थिती निश्चित करण्यासाठी स्कॅन केले जात आहे. अशात तो दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
https://www.instagram.com/reel/CqXkkdzJxJX/?utm_source=ig_web_copy_link
लिव्हिंगस्टोन याने बुधवारी (दि. 29 मार्च) सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात तो नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला होता. लिव्हिंगस्टोनने मागील हंगामात आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 14 सामन्यात 36.42च्या सरासरीने 437 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 182.08 इतका होता. लिव्हिंगस्टोनला मोठमोठे फटके मारण्यासाठी ओळखले जाते. त्याने इंग्लंडकडून 12 वनडे आणि 29 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. मागील हंगामात त्याने फिरकी गोलंदाजीने 6 विकेट्सही चटकावल्या होत्या.
आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू पंजाबकडे
विशेष म्हणजे, आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनलेला इंग्लंडचा सॅम करन (Sam Curran) हादेखील पंजाबच्या ताफ्यात आहे. लिव्हिंगस्टोनव्यतिरिक्त पंजाबला दक्षिण आफ्रिकेचा अव्वल गोलंदाज कागिसो रबाडा याचीही उणीव भासेल. कारण, तो राष्ट्रीय संघाचा भाग असल्यामुळे केकेआरविरुद्ध खेळू शकणार नाहीये. (big blow for punjab kings batter liam livingstone will miss match against kkr ipl 2023 )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या दोन दिवस आधीच स्मिथची भविष्यवाणी; ‘हे’ चार संघ करतील प्लेऑफमध्ये एन्ट्री, RCB अन् MI बाहेर
IPLपूर्वी बांदलादेशमध्ये वादळ, ‘या’ धुरंधराने झळकावली टी20तील वेगवान फिफ्टी, केकेआरचंही नशीब फळफळलं






