---Advertisement---

साधा सुधा नाय, थेट स्टेडिअमच्या बाहेर मारलाय; पाहा लिव्हिंगस्टोनचा गगनचुंबी षटकार

On: सोमवार, ऑक्टोबर 17, 2022 7:10 PM
Liam-Livingstone
---Advertisement---

इंग्लंड संघ टी20 क्रिकेट प्रकारात जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. आधी पाकिस्तान नंतर ऑस्ट्रेलिया आणि आता टी20 विश्वचषकाच्या सराव सामन्यातही इंग्लंडचा दबदबा कायम आहे. टी20 विश्वचषक 2022मधील एका सराव सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा सामना केला. सोमवारी (दि. 17 ऑक्टोबर) पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने 6 विकेट्सने सामना जिंकला. यावेळी इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन याने असा काही फटका मारला की, चेंडू थेट स्टेडिअमच्या बाहेर गेला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

झाले असे की, या सराव सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तानने 19 षटकांच्या या सामन्यात फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 160 धावांची डोंगर उभा केला होता. मात्र, इंग्लंडने हा डोंगर आरामात सैर केला. त्यांनी 14.4 षटकातच 4 विकेट्स गमावत 163 धावा केल्या आणि सामना 6 विकेट्सने खिशात घातला.

या सामन्यात पाकिस्तान संघाकडून फक्त एक षटकार पाहायला मिळाला. मात्र, इंग्लंड संघाकडून षटकारांचा नुसता पाऊस पाडण्यात आला. यामध्ये अनेक खेळाडूंनी षटकार मारले, परंतु लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) याने 16 चेंडूंचा सामना करताना 28 धावा केल्या. या छोट्या खेळीत त्याने 1 चौकार आणि 2 षटकार मारले, जे सामन्याचे हायलाईट्स ठरले.

यातील एक षटकार इतका जोरात मारला की, चेंडू थेट स्टेडिअमच्या बाहेर गेला. शादाब खान याच्या चेंडूवर पुढे येत मारलेला हा गगनचुंबी षटकार थेट स्टेडिअमच्या बाहेर जाऊन पडला. लिव्हिंगस्टोन याने मारलेला हा षटकार पाहून समालोचकही हैराण झाले. दुसरीकडे, सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/Cjz_XyCAFq1/?utm_source=ig_web_copy_link

दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मोईन अली आणि जोस बटलर यांना फलंदाजीची संधी मिळाली नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बेन स्टोक्स याने पाकिस्तान गोलंदाजांच्या नाकी नऊ आणत 18 चेंडूत 36 धावांची वादळी खेळी केली. तसेच, हॅरी ब्रूक आणि सॅम करन यांनी पाकिस्तान गोलंदाजांना चादंण्याच दाखवल्या. ब्रूकने 24 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 45 धावा आणि करनने 14 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 33 धावांची जबरदस्त खेळी केली. विशेष म्हणजे, दोघेही यावेळी नाबाद राहिले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गावसकरांकडून बॅटिंग टिप्स घेऊन बाबर आझम आता भारताला देणार टेन्शन, पाहा व्हिडिओ
भारताचा राग न्यूझीलंडवर काढला! दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्सने मारलं मैदान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---