आयपीएल 2025 स्पर्धेमधील आरसीबी विरुद्ध सीएसके सामना उद्या 28 मार्च रोजी रंगणार आहे. तत्पूर्वी आरसीबी विरुद्ध सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी खुलासा केला आहे की, मथिशा पथिराना बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. पथिराना संघातील मेन गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने मागच्या हंगामात 6 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या होत्या. पथिराना मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सुद्धा खेळू शकला नव्हता.
सध्या मथिशा पथिरानाच्या दुखापतीच्या गंभीरतेवर अधिक माहिती मिळालेली नाही. पण इंडियन एक्सप्रेस मध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार पथिराना दुखापती मधून रिकव्हर होत आहे. 22 वर्षांचा हा युवा गोलंदाज श्रीलंकेचा असून 2022 पासून तो चेन्नई सुपर किंग्स संघात खेळत आहे.
मथिशा पथिरानाचं प्लेइंग इलेव्हनमध्ये न होणं कदाचित चेन्नईसाठी एवढी मोठी अडचण नसेल, कारण संघ खूप मजबूत आहे. चेन्नईच्या वेगवान गोलंदाज डिपार्टमेंटमध्ये खलील अहमद, सॅम करण, मुकेश चौधरी, अंशूल कंबोज, कमलेश नागरकोटी, आणि गुरुजनपीत सिंग सामील आहेत. मागच्या सामन्यात म्हणजेच मुंबई इंडियन्स विरुद्ध खलील अहमदने वेगवान गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या होत्या.
मथिशा पथिराना बद्दल बोलायचे झाल्यास, तो चेन्नई मधील सर्वात प्रभावी गोलंदाजांपैकी एक आहे, तसेच तो युवा आहे. त्याने आत्तापर्यंत त्याच्या आयपीएल करिअरमध्ये 20 सामन्यात एकूण 34 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजी सरासरी 17.41 ची आहे, जी खूप चांगली मानली जाते. चेन्नई आणि बंगळुरु दोन्ही संघांनी स्पर्धेतील त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत.






