---Advertisement---

गुजरात टायटन्सला मोठा धक्का! IPL दरम्यान घरी परतला धारदार वेगवान गोलंदाज

---Advertisement---

शुबमनच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाची आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये सुरुवात जरी पराभवाने झाली असली तरी नंतर संघाने विजय मिळवून सुरुवात केली आहे. पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात गुजरातला 11 धावांनी पराभूत केले होते, पण नंतर गुजरातने पुनरागमन करत दोन सामने जिंकले. पहिल्या सामन्यात त्यांनी मुंबईचा पराभव केला आणि नंतर आरसीबीला त्यांच्या घरेलू मैदानात मात दिली. यानंतर संघ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी पोहोचला आहे. आता याबरोबरच संघासंबंधित एक मोठी अपडेट समोर येत आहे की, त्यांचा घातक वेगवान गोलंदाज स्पर्धेमध्येच घरी परतला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा त्याच्या काही कारणांमुळे आयपीएल सोडून मायदेशी परतला आहे. त्याच्या संघाने याबद्दल माहिती दिली आहे. टायटन्सने हे नाही सांगितले की, रबाडा कधीपर्यंत परत येईल आणि त्याने आतापर्यंत फक्त दोनच सामने खेळले आहेत. गुजरात संघाने एक प्रतिक्रिया देताना म्हटले की, कागीसो रबाडा काही महत्त्वपूर्ण त्याच्या कारणांमुळे दक्षिण आफ्रिका परत गेला आहे. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध एक- एक विकेट्स घेतली होती. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध बंगळूरुमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात संघामध्ये स्थान मिळाले नव्हते. त्याच्या जागी अर्शद खानला संघात संधी मिळाली त्याने विराट कोहलीची महत्वपूर्ण विकेट घेतली.

कागीसो रबाडाची अनुपस्थिती गुजरात टायटन्ससाठी एक मोठं नुकसान ठरू शकते. आशिष नेहराच्या संघाने मेगा लिलावात एक शानदार वेगवान गोलंदाजी पर्याय स्वरूपात त्याला खरेदी केले होते. सध्या संघाला त्याचा फायदा होऊ शकणार नाही. हे कधीपर्यंत नीट होईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. आरसीबी विरुद्ध गुजरातने दाखवून दिले की, रबाडा शिवाय त्यांची गोलंदाजी मजबूत आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अर्शद खानने शानदार गोलंदाजी करून बंगळुरूला त्यांच्याच मैदानात खूप त्रास दिला.

2017 मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलेल्या कागीसो रबाडा गुजरातसाठी खेळण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स संघासाठी खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएल करिअरमध्ये 82 सामन्यात वेगवान गोलंदाजीने 119 विकेट्स घेतल्या आहेत. सर्वोत्तम प्रदर्शन त्याने 2018, 2019 आणि 2022 हंगामात केलं आहे. ज्यामध्ये त्याने 25, 30, 23 विकेट्स घेतल्या होत्या. गुजरातचा पुढचा सामना 6 एप्रिल रोजी राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---