10 डिसेंबरपासून भारत विरुद्ध टी20 मालिका सुरु होण्यापूर्वीच यजमान दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर गेला आहे. लुंगी एनगिडीला डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे आणि अशा स्थितीत त्याच्या जागी बुरेन हेंड्रिक्स याचा संघात समावेश करण्यात आला आहे. एनगिडी कसोटी मालिकेतही खेळणार हे निश्चित नाही.
लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी20 सामन्यांमध्ये खेळणार होता आणि त्यानंतर कसोटी सामन्यात भाग घेणार होता. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी त्याला हा सामना खेळायचा होता, पण आता दुखापतीमुळे त्याला खेळवायचं की नाही हे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा वैद्यकीय संघ ठरवेल.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात आधीच दोन अनुभवी वेगवान गोलंदाज होते. कगिसो रबाडा याला विश्रांती देण्यात आली असून ऍनरिक नाॅर्खिया दुखापतीमुळे बराच काळ बाहेर आहे. मात्र, असे असूनही त्यांच्याकडे जेराल्ड कोएत्झी,(Gerald Coetzee) लिझार्ड विल्यम्स (Lizard Williams) आणि आता बुरेन हेंड्रिक्स (Buren Hendricks) सारखे वेगवान गोलंदाज आहेत.
भारतीय क्रिकेट संघ 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात करणार आहे आणि यामध्ये प्रथम टी20 मालिका खेळवली जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 टी20, वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत पण टी20 मालिका आधी खेळवली जाईल. भारतीय क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिन्ही फॉरमॅटसाठी संघांची घोषणा केली आहे.सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला टी20 आणि केएल राहुल (KL Rahul) याची वनडेमध्ये कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, तर रोहित शर्मा कसोटी संघाची कमान सांभाळणार आहे. पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यालाही या दोन्ही मालिकेत स्थान मिळालेले नाही. (Big blow to South Africa ahead of T20 series against India veteran bowler out of series due to injury)
महत्वाच्या बातम्या
‘कधी असे स्वप्नातही…’, टी20 नंबर वन गोलंदाज बनल्यानंतर रवी बिश्नोईची खास प्रतिक्रिया
हैदराबाद पस्तावणार! ज्या खेळाडूला केले रिलीज, त्याने 2 ओव्हरमध्ये हॅट्रिकसह घेतल्या 5 विकेट्स; वाचाच