जगभरात जेवढे क्रिकेट बोर्ड आहेत. त्यांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआय हे सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. 2008पासून इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलची सुरुवात झाली, तेव्हापासून बीसीसीआयच्या संपत्तीत वाढच होत आहे. अशात माध्यमांतील वृत्तांनुसार, सध्या बीसीसीआयची एकूण संपत्ती 18760 कोटी रुपये एवढी झाली आहे. चकित करणारी बाब अशी की, बीसीसीआयची नेटवर्थ दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा 28 पटींनी जास्त आहे.
अलीकडेच संपलेल्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेचे बीसीसीआयची नेटवर्थ (BCCI Net Worth) इथपर्यंत नेण्यात खास योगदान आहे. सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या बोर्डांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची नेटवर्थ (Australia Net Worth) जवळपास 658 कोटी रुपये आहे. अशात हेच अंतर दाखवण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे की, बीसीसीआयचा जागतिक क्रिकेटमध्ये इतका दबदबा का आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय क्रिकेट बोर्डा 2.25 अब्ज रुपये सूचीबद्ध केली.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1733122903632400495
एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची नेटवर्थ 78 मिलियन म्हणजेच जवळपास 658 कोटी रुपये आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या कमाईत बिग बॅश लीगचे सर्वात मोठे योगदान आहे. बीबीएल जगातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रचंड पैसा कमावणाऱ्या लीगपैकी एक आहे. तसेच, बीसीसीआयपासून दूर असूनही क्रिकेट ऑस्ट्रेलिया पैशांच्या ताकदीच्या हिशोबाने चांगलीच मजबूत आहे.
दुसरीकडे, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड 59 मिलियन डॉलर्ससह तिसऱ्या स्थानी आहे. हा आकडा ईसीबीची मजबूती दाखवण्यासाठी पुरेसा आहे. इंग्लंडमध्ये सामन्यांदरम्यान स्टेडिअम गच्च भरलेले असणे, हे दाखवून देते की, इथे क्रिकेटची लोकप्रियता अजूनही कायम आहे.
विश्वचषक 2023मधून भारतीय अर्थव्यवस्थेला किती फायदा?
भारतात क्रिकेटला धर्म म्हटले जाते. नुकत्याच संपलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेवरून याचा प्रत्यय येतो, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदाही झाला आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकला नसला, तरीही आयसीसी आणि बीसीसीआय यातून झालेल्या कमाईमुळे समाधानी आहेत. वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार, विश्वचषकामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जवळपास 22 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. (big news world cup 2023 takes bcci s net worth at this level australia is in second position)
हेही वाचा-
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाने केली नवीन पूर्ण वेळ कर्णधाराची घोषणा, तिन्ही क्रिकेट प्रकारात करणार संघाचे नेतृत्व
विराट-नवीन वादावर गंभीरने पुन्हा काढला राग; आता तर म्हणाला, ‘कुणीही येऊन माझ्या खेळाडूंना…’