---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

On: शनिवार, डिसेंबर 9, 2023 12:00 AM
Lungi Ngidi
---Advertisement---

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20, वनडे आणि कसोटी मालिका भारतीय संघाला या दौऱ्यात खेळायची आहे. गुरुवारी (7 डिसेंबर) भारतीय संघ या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेद दाखल झाला. रविवारी (10 डिसेंबर) उभय संघांतील तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे. पण त्याआधी यजमान दक्षिण आफ्रिका संघाच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसते.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना 10 डिसेंबर, दुसरा सामना 12 डिसेंबर आणि तिसरा सामना 14 डिसेंबर रोजी आयोजित केला गेला आहे. लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) याला पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी संघात निवडले गेले होते. पण डाव्या घोट्याला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. याच दुखापतीमुळे एनगिडी टी-20 मालिकेत खेळू शकणार नाहीये. त्याने टी-20 मालिकेतून माघार घेतलीच, पण उभय संघांतील कसोटी मालिकेतही त्याच्या खेळण्यावर संशय उपस्थित झाला आहे.

दरम्यान, उभय संघांतील तीन सामन्यांची वनडे मालिका 17 डिसेंबर रोजी वनडे मालिकेला सुरुवात होईल. मालिकेतील दुसरा वनडे सामना 19 डिसेंबर, तर तिसरा वनडे सामना 21 डिसेंबर रोजी आयोजित केला गेला आहे. उभय संघांतील कसोटी मालिका 26 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी रोजी आयोजित केला गेला आहे. लुन्गी एनगिडी याला टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघात निवडले गेले होते. पण टी-20 मालिकेतून एनगिडीने माघार घेतल्यानंतर कसोटी मालिकतून देखील वेगवान गोलंदाज माघार घेऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या – 
U19 Asia Cup 2023 । अर्शीन कुलकर्णी ठरला मॅच विनर, पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानला चारली धूळ
IPL 2024 । पंजाब किंग्जला ट्रॉफी जिंकवून देण्याची जबाबदारी संजय बांगरांच्या खांद्यावर! दिग्गज नव्या भूमिकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---