दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्सेसिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. डू प्लेसिस नुकताच पाकिस्तान दौऱ्यातील कसोटी मालिकेत खेळला होता.
त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करताना त्याचा कसोटीतील एक फोटो शेअर करत त्याचे निवृत्ती घेत असल्याचे प्रसिद्धी पत्रक शेअर केले आहे. तसेच या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की ‘माझे मनात निर्णय स्पष्ट आहे आणि नव्या अध्यायाकडे जाण्यासाठी ही योग्य वेळ आहे.’
याबरोबरच त्याने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘या वर्षाने सर्वांनाच अनेक गोष्टींचा पुन्हा विचार करायला लावला आहे. माझ्याबाबतही अनेक गोष्टी या दरम्यान स्पष्ट झाल्या. पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या देशासाठी सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याबद्दल मला अभिमान आहे. पण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची माझी वेळ आली आहे.’
तसेच त्याने पुढे म्हटले की ‘जर कोणी मला १५ वर्षांपूर्वी सांगितले असते की मी दक्षिण आफ्रिकेसाठी ६९ कसोटी सामने खेळणार आहे आणि संघाचे नेतृत्वही करणार आहे, तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता. माझ्या कसोटी कारकिर्दीबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारांमुळेच मी आज अभिमानाने एक व्यक्ती म्हणून उभा आहे.’
तसेच पुढील काळात २ टी२० विश्वचषक होणार असल्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करायचे असल्याचेही डू प्लेसिसने प्रसिद्धीपत्रकार स्पष्ट केले आहे. तसेच त्याने सांगितले आहे की त्याला सर्वोत्तम खेळाडू बनण्यासाठी जगभरात शक्य होईल तितके क्रिकेट खेळायचे आहे. तसेच डू प्सेसिसने म्हटले आहे की दक्षिण आफ्रिकेसाठी टी२० क्रिकेटच्या प्रकारात आणखी योगदान तो देऊ शकतो.
त्याचबरोबर फाफ डू प्लेसिसने असेही स्पष्ट केले की जरी त्याचे लक्ष्य पुढील २ टी२० विश्वचषक असले तरी वनडे क्रिकेटकडे दुर्लक्ष होणार नाही. त्याने म्हटले की तो पुढील केवळ काही काळासाठी टी२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये २०१२ साली पदार्पण करणाऱ्या डू प्लेसिसने पुढे म्हटले की तो दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाबरोबर त्याच्या भविष्याबद्दल चर्चा करणार आहे.
डू प्सेसिसने त्याच्या प्रसिद्धीपत्रकात अखेर सर्वांचे आभार मानले आहेत. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत योगदान दिलेल्या प्रत्येकाचे तसेच कुटूंबाचे आभार मानले आहेत. याबरोबरच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे, प्रशिक्षकांचे, संघसहकाऱ्यांचे, सपोर्ट स्टाफचे देखील आभार त्याने मानले आहेत.
https://www.instagram.com/p/CLYYrqHlrjf/
डू प्लेसिसने त्याच्या कारकिर्दीत ६९ कसोटी सामने खेळले असून ४१६३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १० शतकांचा आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम १९९ धावांची खेळी श्रीलंकेविरुद्ध केली होती.
Faf du Plessis has announced his retirement from Test cricket.
He played 69 Tests for South Africa scoring 4163 runs at 40.02, including 10 centuries. pic.twitter.com/QfhRjsWqxr
— ICC (@ICC) February 17, 2021
डू प्लेसिसने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०१२ साली कसोटीत पदार्पण करताना शतकी खेळी साकारली होती. त्याने ऍडलेड येथे २०१२ साली कसोटी पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावात ७८ आणि दुसऱ्या डावात नाबाद ११० धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी सामना वाचवताना एबी डिविलियर्सबरोबर ४०८ चेंडूत ८९ धावांची भागीदारी केली होती. आजही ही भागीदारी अनेकांच्या लक्षात आहे.
फाफ डू प्लेसिसने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३६ कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्वही केले आहे. यातील १८ कसोटीत विजय आणि १५ कसोटीत पराभव त्याने पाहिले आहेत. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला ३ सामने अनिर्णित राखण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वयाच्या २८ व्या वर्षीच क्विंटॉन डीकॉकने घेतला मेंटल ब्रेक, ‘या’ टी२० स्पर्धेला मुकणार
“भारताने आम्हाला तिन्ही आघाड्यांवर मात दिली असली तरी…”, इंग्लिश कर्णधार जो रूटची प्रतिक्रिया
आयपीएल लिलावात ‘या’ चौघांवर असेल चेन्नईची नजर, एका विदेशी खेळाडूचा समावेश