एशियन गेम्स 2023 स्पर्धेत भारतीय संघाने आणखी एक सुवर्णपदक नावावर केले आहे. शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) बॅडमिंटन खेळात पुरुष दुहेरी फेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या जोडीने सुवर्ण पदक जिंकले. सुवर्ण पदकाच्या सामन्यात या सामन्यात भारतीय जोडीने कोरियाच्या किम वोंग आणि चोई सोल या जोडीला 21-18 आणि 21-16 अशा सरळ सेटमध्ये पराभवाची धूळ चारली.
यासह एशियन गेम्सच्या इतिसाहात पहिल्यांदाच भारताला बॅडमिंटन खेळात सुवर्ण पदक (India’s First Badminton Gold Medal in Asian Games History) मिळवण्यात यश आले. यापूर्वी ना एकेरी, दुहेरीच्या वैयक्तिक किंवा संघाच्या बॅडमिंटन खेळात भारताने कधीच सुवर्ण पदक जिंकले नव्हते. त्यामुळे हे सुवर्ण पदक खूपच खास आहे. हे भारताचे आतापर्यंतचे 26वे सुवर्ण पदक ठरले.
SATWIK & CHIRAG – THE GOLDEN BOYS OF INDIA….🇮🇳
This is the first ever Gold medal for India in Asian Games in Singles or Doubles in Team or individual in Badminton. pic.twitter.com/CaYDikVOba
— Johns. (@CricCrazyJohns) October 7, 2023
चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज (Chirag Shetty and Satwik Sairaj) या भारतीय जोडीला पुरुष दुहेरीत सुवर्ण पदक जिंकण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. एकेवेळी पहिल्या सेटमध्ये सात्विक-चिराग कोरियन जोडीपासून पिछाडीवर होते, पण दोघांनी जबरदस्त पुनरागमन करत स्कोर 13-13च्या बरोबरीवर आणला. यानंतर भारतीय जोडीने परत मागे वळून पाहिलेच नाही. तसेच, पहिला सेट 21-18ने आपल्या नावावर केला.
चिराग-सात्विक या जोडीने दुसऱ्या सेटमध्येही क्रॉस कोर्टवर शानदार खेळ दाखवला. कोरियन जोडीने पुनरागमनाचा पुरेपूर प्रयत्न केला आणि नेट्सवर गुणही मिळवले. मात्र, भारतीय जोडीने संयम सोडला नाही आणि आक्रमक खेळ कायम ठेवत दुसरा सेटही 21-16ने आपल्या नावावर करत सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले.
GOLD MEDAL NO.26 FOR INDIA…!!! 🇮🇳
Chirag and Satvik won🏅in Badminton Doubles at Asian Games. pic.twitter.com/bfdjRleOKT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 7, 2023
खरं तर, चिराग शेट्टी (Chirag Shetty) आणि सात्विक साईराज (Satwik Sairaj) यांनी मागील दोन्ही सामन्यात चोई सोल- किम वोंग या कोरियन खेळाडूंना पराभूत केले होते. यावर्षी मलेशिया ओपनमध्ये भारतीय जोडीने 21-16 आणि 21-13ने कोरियन खेळाडूंना मात दिली होती. त्यापूर्वी फ्रेंच ओपन 2022मध्येही उपांत्य सामन्यात 21-18, 21-14ने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. (big day for india chirag shetty satwik sairaj rankireddy indians doubles pair beat korean pair and won first ever gold medal in asian games history)
हेही वाचा-
अरेरे! CWC23च्या तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान दोनशेच्या आत All Out, बांगलादेशचे मेहिदी-शाकिब चमकले
रचिनची बॅटिंग पाहून भारताचा हेड कोच द्रविडही झाला फिदा; म्हणाला, ‘त्याच्यात राहुल कमी अन् सचिन…’